अगोदर भयानक भूकंपाचे धक्के आणि त्यानंतर थेट त्सुनामीचा इशारा देण्यात आला. यामुळे लोकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण हे बघायला मिळतंय. धक्कादायक म्हणजे या भूकंपाच्या धक्क्यावेळीची काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आली आहेत. बुधवारी (30 जुलै) रशियातील कॅमचटका येथे भयानक भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.7 इतकी होती. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, हा भूकंप समुद्राखाली झाला. त्यानंतर आता त्सुनामीचा मोठा धोका आहे.
अमेरिका आणि जपानमध्ये त्सुनामीचा मोठा धोका
या भूकंपानंतर अमेरिका आणि जपानमध्ये थेट त्सुनामीचा इशारा देण्यात आला. या भूकंपामध्ये मोठे नुकसान झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र, अजून स्पष्ट होऊ शकले नाही की, या भूकंपात नेमके किती नुकसान झाले. थरकाप उडवणारी या भूकंपाची व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. भूकंपाचे केंद्र समुद्रात असल्याने धोका हा अधिकच वाढल्याचे दिसत आहे.
प्रशासनाकडून लगेचच बोलावण्यात आली महत्वाची बैठक
वृत्तानुसार, या भूकंपानंतर जपानच्या हवामान संस्थेने म्हटले आहे की, 1 मीटर उंचीच्या लाटा जपानच्या किनारपट्टीच्या भागात येऊ शकतात. जपानचे पंतप्रधान यांना या भूकंपाची संपूर्ण माहिती देण्यात आली असून प्रत्येक गोष्टीवर ते स्वत: नजर ठेऊन आहेत. हेच नाही तर सरकारकडून लगेचच आपत्कालीन बैठकही बोलावली. ज्यामध्ये मदत आणि बचाव कार्यांवर चर्चा करण्यात आली.
भूकंपाचे केंद्रस्थान समुद्रात धोका अधिक तीव्र
कोणत्याही परिस्थितीमध्ये परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू केलीये. रशियामध्ये पहिल्यांदा भूकंप आला, असे अजिबातच नाहीये. यापूर्वीही अनेकदा भूकंप येऊन गेलाय. या वर्षी 20 जुलै रोजी कॅमचटकामध्येही तीव्र भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 होती. अमेरिकेकडूनही त्सुनामीचा इशारा अनेक भागात देण्यात आला आहे. पुढील तीन तासांत रशिया आणि जपानच्या काही भागात धोकादायक त्सुनामी लाटा धडकू शकतात, असे म्हटले आहे. पुढील काही तास अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जातंय लोकांनाही सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे.