Girlfriend Killed : 'ती' दुसऱ्या धर्माची होती, कसं लग्न करायचं? OYO त नेऊन प्रेयसीची गळा दाबून हत्या, 10 वर्षांपासून होते प्रेमसंबंध
esakal July 30, 2025 01:45 PM

Faridabad OYO Case, Girlfriend Killed : फरिदाबादमधील एका ओयो हॉटेलमध्ये दीपक नावाच्या तरुणानं आपली प्रेयसी (गर्लफ्रेंड) शीबाची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दीपकला अटक केली आहे.

१० वर्षांपासून दीपकसोबत होती रिलेशनशिपमध्ये

माहितीनुसार, शीबा आयसीआयसीआय बँकेत(ICICI Bank) काम करत होती आणि ती गेल्या १० वर्षांपासून दीपकसोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही महिन्यांपासून ती दीपकवर लग्नासाठी दबाव टाकत होती. या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते.

मुलांना घरी शिकवायला यायचा, ट्यूशन शिक्षकासोबत बेडरुममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत सापडली पत्नी; अवैध संबंधातून पतीची हत्या! धर्मभेदामुळे नात्यात तणाव

शीबाची आई रझिया यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, दीपकला शीबाशी लग्न करण्यास धर्मभेद आड येत होता. पोलिसांच्या चौकशीत दीपकनं सांगितलं, की “ती दुसऱ्या धर्माची आहे, मी तिच्याशी लग्न कसं करू शकतो? ती रोज लग्नासाठी दबाव आणत होती आणि असहाय्यतेतून मी हा निर्णय घेतला.”

'मी मरतेय, मुख्यमंत्रीसाहेब यांना सोडू नका' पोलीस पत्नीचा सासरी छळ, गळफास घेत संपवलं आयुष्य पोलिस तपास सुरू

सध्या दीपकला अटक करण्यात आली असून, हत्येच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू आहे. पोलीस सर्व पुरावे गोळा करत आहेत आणि पुढील चौकशीदरम्यान दीपक आणखी काय कबुली देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.