चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागेल याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजही अनेकांना चाणक्य यांच्या विचारांपासून प्रेरणा मिळते. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.
संयम – चाणक्य म्हणतात आयुष्यात संयमाला खूप महत्त्व असतं, एखादी गोष्ट आपल्याला मिळावी असं तुम्हाला वाटतं असतं. ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही दिवसरात्र एक करता, खूप प्रयत्न करता, मात्र कधी-कधी अशी परिस्थिती येते की, तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यात अपयश येतं. तुम्हाला जेव्हा अपयश येत, तेव्हा तुम्ही प्रयत्न सोडून देतात. यामुळे होतं काय की ती गोष्टी तुम्हाला परत कधीच मिळत नाही, मात्र हे लक्षात ठेवा, आयुष्यात संयम ठेवा. पुन्हा प्रयत्न करा, एक दिवस ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल पण त्यासाठी तुमच्याकडे संयम असला पाहिजे.
नियोजन – चाणक्य म्हणतात की आयुष्यात सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट जर असेल तर ती असते नियोजन, तुम्ही एखादं काम सुरू करता, मात्र जर तुम्ही त्यासाठी आधीच योग्य नियोजन केल नसेल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेलच याची खात्री नसते, मात्र जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी जेव्हा नियोजन करता तेव्हा आर्धी लढाई तुम्ही आधीच जिंकलेली असते.
धनाचा संचय – चाणक्य म्हणतात पैसा, धन ही अशी गोष्ट आहे, जी माणसाला त्याच्या वाईट काळात उपयोगी येते, आयुष्यात कधी कोणता प्रसंग येईल ते सांगता येत नाही, अशा स्थितीमध्ये तुमच्याकडे पैसा असला पाहिजे, त्यासाठी पैशांची बचत करा.
कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद – चाणक्य म्हणतात आयुष्य माणसाची नेहमी परीक्षा पाहात असतं, कधी कोणता प्रसंगी येईल हे सांगता येत नाही. अशा स्थितीमध्ये तुम्ही कठीण परिस्थितीला न डगमगता सामोरं गेलं पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)