अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
Nashik : नाशिक सक्तवसुली संचालनालय (ED)कडून माजी आयुक्त अनिल पवार यांना मोठा दणका दिला आहे. ईडीने अनिल पवार यांच्या नाशिकमधील आणि इतर ठिकाणच्या मालमत्तांची चौकशी सुरू केली आहे. या कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोलाईडीच्या पथकाने पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी परिसरात अनिल पवार यांच्या मालकीच्या ४१३ चौरस मीटरच्या प्लॉटची पाहणी केली. त्यांचा हा प्लॉट निसर्गरम्य ठिकाणी आहे. ईडीने याआधीच त्याची कागदोपत्री जप्ती केली आहेत.
Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?ईडीच्या प्राथमिक तपासात, अनिल पवार यांनी प्रशासकीय पदावर असताना कायद्याच्या पळवाटा शोधल्या. त्यानंतर पांडवलेणी परिसरातील प्लॉट स्वत:च्या नावे केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या संदर्भात कागदपत्रांची आणि व्यवहारांची बारकाईने तपासणी केली जात आहे.
नाशिकच्या पांडवलेणी परिसरातील पाहणीनंतर सटाणा येथील अनिल पवार यांच्या इतर मालमत्तांचीही चौकशी करण्यात आली. संबंधित मालमत्तांबाबत अनियमितता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. त्यासंबंधी ईडीकडून अधिक तपशील गोळा केला जात आहे. ही कारवाई आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित असल्याचंही सांगण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी काही मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ईडीच्या या हालचालींमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO मुख्य निरीक्षण अधिकारी लाच घेताना ACB च्या जाळ्यातअन्न व नागरी पुरवठा विभागातील मुख्य निरीक्षण अधिकारी विनायक निकम याला 1.75 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मुंबईने रंगेहाथ अटक केली. तक्रारदार हा कांदिवलीतील गॅस एजन्सीमध्ये मॅनेजर आहे. त्याच्या मामाची गॅस एजन्सी ठाण्यात आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात संबंधित अधिकाऱ्याने गॅस एजन्सींवर कारवाई केली होती. त्यानंतर पुढील कारवाई टाळण्यासाठी आणि व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी निकम याने तक्रारदाराकडे दरमहा 2.5 लाखांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर रक्कम 1.75 लाखांवर आली. तक्रारदाराने ही बाब ACB कडे कळवली. त्यानंतर 25 जुलै रोजी पडताळणी करण्यात आळी. त्यानंतर 29 जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली.