वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता आज शनिवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी वाराणसी या आपल्या मतदारसंघात जाणार आहेत. त्याठिकाणी आयोजित कार्यक्रमातून ते किसान सन्मान निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करतील. यापूर्वी शेवटचा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जारी करण्यात आला होता. पीएम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जातो. सद्यस्थितीत देशभरातील जवळपास साडेनऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेला लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती.