50 हून अधिक महिलांचे शोषण; पेनड्राईव्हमध्ये 3 हजार क्लिप्स : वासनाधीन प्रज्वल रेवण्णाच्या स्कँडलची A टू Z स्टोरी!
Sarkarnama August 02, 2025 09:45 PM
Incidents of rape बलात्कार

बंगळूरू विशेष न्यायालयाने जनता दल (सेक्युलर)चा माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्याला शनिवारी (ता.02 ) शिक्षा सुनावणली जाणार आहे.

Prajwal Revanna Rape Case प्रज्वल रेवण्णा

मागील वर्षी फार्महाउसमध्ये काम करणाऱ्या 47 वर्षीय महिलेने प्रज्वल रेवण्णाविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार केली होती.

Prajwal Revanna Rape Case धमकी

यामध्ये 2021 पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आणि व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

Prajwal Revanna Rape Case आरोप

त्याच्यावर 50 हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार, धमकी देणे, अश्लील फोटो व्हायरल करणे अशा विविध कलमांखाली आरोप करण्यात आलेत.

Prajwal Revanna Rape Case एच. डी. देवेगौडा

प्रज्वल माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी हसनमध्ये त्याचा एक पेन-ड्राइव्ह समोर आल्यानंतर त्याचे कारनामे उघडकीस आले.

Prajwal Revanna Rape Case पेन ड्राइव्ह

पेन ड्राइव्हमधील 3 ते 5 हजार व्हिडीओंमध्ये तो महिलांचे लैंगिक छळ करताना दिसतोय. हे प्रकरण वाढल्यानंतर राज्य सरकारने SIT स्थापन करत त्याच्या विरोधात FIR दाखल केला.

Prajwal Revanna Rape Case SIT

SIT ने आपल्या तपासात उघड केलं की प्रज्वलने 50 हून अधिक महिलांचे लैंगिक छळ केला. या महिला 22 ते 61 वयोगटातील होत्या.

Prajwal Revanna Rape Case आमिष

50 पैकी सुमारे 12 महिलांवर जबरदस्तीने बलात्कार केल्याचं तर उर्वरित महिलांवर आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्यातं तपासात उघड झालं.

Prajwal Revanna Rape Case राजकीय ताकद

रेवण्णाने राजकीय ताकद वापरत काही महिलांना सब-इन्स्पेक्टर, तहसीलदार, तर काहींना अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी मिळवून दिल्याचं उघडकीस आलं आहे.

IPS officer Pankaj Kumawat NEXT : अखेर बीडला डॅशिंग अधिकाऱ्याची एन्ट्री होणार! कोण आहेत पंकज कुमावत? क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.