“Act Like Urban Naxals, You’ll Be Arrested”: Devendra Fadnavis Hits Back at Raj Thackeray’s Challenge : शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जनसुरक्षा कायद्यावरून त्यांनी फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. "आम्हाला अर्बन नक्षल म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःची पात्रता तपासावी," असं ते म्हणाले. तसेच, "आम्हाला फक्त अटक करून दाखवा," असं आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिलं.
दरम्यान, राज ठाकरेंच्या याच आव्हानाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "जर तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल, तर तुम्हाला अटक केली जाईल," असं त्यांनी म्हटलं. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं.
CM Devendra Fadnavis : ‘ग्रोथ हब’मुळे विकासाला बळ, देवेंद्र फडणवीस; राज्य सरकार व नीती आयोगात करार काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?"हा कायदा त्यांच्यासाठी बनलेला नाही, मग त्यांना अटक का होईल? जर तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल, तरच अटक होईल. तुम्ही तसं वागत नाही, त्यामुळे अटक करण्याची गरज नाही. अशा प्रकारे जे वागतात, त्यांच्यासाठीच तो कायदा आहे," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, "हा कायदा आंदोलकांविरोधात नाही. सरकारविरोधात बोलण्याची सर्वांनाच मुभा आहे." तसेच, "राज ठाकरे अशा प्रकारची विधाने करत आहेत, याचा अर्थ त्यांनी तो कायदा अजून वाचलेलाच नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी आग्रही आहे," असं ते म्हणाले होते. यालाही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
CM Devendra Fadnavis : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाचा आदेश लवकरच"महाराष्ट्रात मराठी शिकलीच पाहिजे आणि ती अनिवार्य असली पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. पण मराठी मुलांनी मराठीसोबत आणखी एक भारतीय भाषा शिकली, तर त्यात काय चूक आहे? भारतीय भाषेला विरोध करून इंग्रजीसाठी पायघड्या घालण्याची जी मानसिकता आहे, त्याला मी विरोध करतो," असं फडणवीस म्हणाले.