देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी दिलं उत्तर; म्हणाले, 'विरोधकांचा पराभव निश्चित'
esakal August 03, 2025 03:45 PM

Vice President Election 2025 : भारताच्या पुढील उपराष्ट्रपतींची निवडणूक ९ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगानं (Election Commission) गुरुवारी केली आहे. आयोगानं सांगितलं, की निवडणूक मंडळाची रचना पूर्ण झाली असून, लवकरच अधिसूचना जारी होणार आहे.

'सत्ताधारी पक्षाचा विजय निश्चित'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी माध्यमांशी बोलताना आगामी निवडणुकीविषयी आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी स्पष्ट केलं की, 'पुढील उपराष्ट्रपती कोण असेल हे सांगता येत नाही, पण एवढे निश्चित आहे की तो सत्ताधारी पक्षाने नामांकित केलेला उमेदवार असेल.'

'पश्चिम बंगालमध्ये तब्बल 1 कोटी बनावट मतदार, रोहिंग्या-बांगलादेशी मतदारांची नावे यादीतून काढून टाका'; SIR वरुन वादंग

थरूर यांनी कारण स्पष्ट करताना सांगितलं की, 'ही निवडणूक केवळ लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांद्वारे होत असल्याने बहुमत कुणाकडे आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या तुलनेत राज्य विधानसभांचा या प्रक्रियेत सहभाग नसतो, त्यामुळे निकाल जवळजवळ स्पष्ट आहे.'

धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालं पद

भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी आरोग्य कारणास्तव राजीनामा दिला. त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये हे पद स्वीकारलं होतं आणि त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ पर्यंत असणार होता. मात्र, सुमारे दोन वर्षे आधीच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

Education Minister : शिक्षणमंत्री पडले बाथरूममध्ये, मेंदूत आढळल्या रक्ताच्या गुठळ्या, प्रकृती गंभीर; राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निवडणूक प्रक्रिया कशी होणार?

संविधानाच्या कलम ६६ नुसार, उपराष्ट्रपतींची निवडणूक केली जाते. या निवडणुकीत लोकसभा व राज्यसभा सदस्य गुप्त मतदानाद्वारे मतदान करतात. निवडणूक आयोगाने सांगितले की, 'अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीची अंतिम प्रत सार्वजनिक केली जाईल व ती आयोगाच्या कार्यालयातून उपलब्ध होईल.'

एनडीएचा विजय जवळपास निश्चित?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असून राज्यसभेतही त्यांचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत एनडीएचा उमेदवार सहजपणे विजयी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नसली, तरी भाजपच्या सूत्रांनुसार ऑगस्टच्या मध्यापर्यंत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.