Latest Maharashtra News Updates : 'महादेवी हत्तीण' परत मिळविण्यासाठी 'स्वाभिमानी'ची आज पदयात्रा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा
esakal August 03, 2025 03:45 PM
Naveen Patnaik : ओडिशात १५ वर्षीय मुलीला पेटवले; माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्यक्त केलं दु:ख

१९ जुलै रोजी पुरीतील बालंगा येथे हल्लेखोरांनी पेटवून दिलेल्या १५ वर्षीय मुलीच्या मृत्यूबद्दल ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त केला आहे.

Actress Ramya : मंड्याच्या माजी खासदार आणि अभिनेत्री रम्या हिच्यावर अश्लील टिप्पणीप्रकरणी दोघांना अटक

बंगळूर : मंड्याच्या माजी खासदार आणि अभिनेत्री रम्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून केंद्रीय गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली आहे, अशी माहिती बंगळूरचे पोलिस आयुक्त सीमांतकुमार सिंह यांनी शनिवारी दिली.

Karnataka News : काँग्रेस धोरणाविरोधात भाजपची मंगळवारी निदर्शने

बंगळूर : काँग्रेसच्या ‘असंवैधानिक वर्तना’विरोधात मंगळवारी (ता. ५) बंगळूरमध्ये भाजप निषेध करणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी शनिवारी जाहीर केले. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील त्याच दिवशी ‘मतदानातील गैरप्रकारां’विरोधात निषेध करणार आहेत.

Mahadevi Elephant : 'महादेवी हत्तीण' परत मिळविण्यासाठी 'स्वाभिमानी'ची आज पदयात्रा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा

‘महादेवी हत्तीण’ परत मिळविण्यासाठी रविवारी (ता.३) पहाटे पाच वाजता नांदणी येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. दिवसभरात ४५ किलोमीटर चालत ही पदयात्रा कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यात हजारो सर्वधर्मीय नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. नांदणी निशिधीका येथे श्री चक्रेश्वरी देवीची आरती झाल्यानंतर पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर निशिधीका-माणगांवेकोडीहून कोल्हापूर-सांगली महार्गावर येणार आहे.

Prajwal Revanna News : धजदचा हासनचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा, १० लाखांचा दंड

Latest Marathi Live Updates 3 August 2025 : के. आर. नगरमधील घरात घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेवर अत्याचार आणि अपहरण प्रकरणात लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने धजदचा हासनचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा आणि १० लाख रुपयांपेक्षा जास्त दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच बिहारमधील मसुदा मतदारयाद्यांवरून राजकारण तापले असून, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नव्या यादीमध्ये स्वतःचे नावच नसल्याचा आरोप केला आहे. जम्मू- काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी शनिवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. काँग्रेसमधील नेतृत्व बदलाला मोठा ‘ट्विस्ट’ आला आहे. आता सिद्धरामय्या नाहीत, डी. के. शिवकुमार नाहीत, तर जी. परमेश्वर मुख्य केंद्रबिंदू म्हणून आता उदयास आले आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.