सुपरस्टार रजनीकांत बस कंडक्टर असताना त्यांचा पगार किती होता; एवढ्या पैशात चालवायचे घर
Tv9 Marathi August 04, 2025 07:45 PM

साऊथ सुपरस्टार आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दिग्गज अभिनेता म्हणजे रजनीकांत. रजनीकांत यांच्या स्टाईलचे , अभिनयाचे विशेषत: त्यांच्या फायटींग सीनचे सगळेच फॅन आहेत. ते आता 74 वर्षांचे आहेत. तथापि, त्यांचे अभिनयावरील प्रेम अजिबात कमी झालेले नाही. हा अभिनेता अजूनही असं काम करतो की सर्वांना आश्चर्य वाटतं. त्यांचे फॅन हे जगभरात आहेत. या वर्षी ते 75 वर्षांचे होणार आहेत. या वयातही ते चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसतात.

पहिला पगार 1000 रुपयांपेक्षाही कमी 

रजनीकांत यांनी त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1975 मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रजनीकांत यांनी साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत खूप प्रसिद्धी मिळवली. तथापि, अभिनेता होण्यापूर्वी त्यांनी बस कंडक्टर म्हणून काम केलं आहे. आज ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. पण ते जेव्हा बस कंडक्टर होते तेव्हा त्यांचा पहिला पगार किती होता हे जर समजलं तर नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. त्यांचा पहिला पगार हा एक हजार रुपयांपेक्षाही कमी होता.

रजनीकांतचा पहिला पगार किती होता?

रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे. अभिनेता होण्यापूर्वी ते बस कंडक्टर म्हणून काम करत होते. त्यांना दरमहा 750 रुपये मिळायचे. त्या पैशांमध्येच त्यांना घर भागवावं लागयाचं.

नवीन चित्रपट लवकरच…

मीडिया रिपोर्ट्सनुसार रजनीकांत ‘कुली’ चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. 350 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच रजनीकांत यांच्या अभिनयाबद्दल बोलताना सर्वांना नेहमीच कौतुक वाटतं.

आता इतक्या कोटींचे मालक 

एकेकाळी महिन्याला फक्त 750 रुपये कमावणारे रजनीकांत आता 430 कोटींचे मालक आहेत. हा अभिनेता चेन्नईच्या पॉश भागात असलेल्या पोस गार्डनमध्ये त्याच्या कुटुंबासह राहतो. त्याच्या घराची किंमतच सुमारे 35 कोटी रुपये आहे. रजीकांत यांनी त्यांच्या कामाने आणि मेहनतीने ही प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.