भारताचे बॅडमिंटनमधील जोडपं सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहेत.
सायना आणी पारुपल्ली कश्यप यांनी अनेक वर्षांच्या रिलेशनशीपनंतर २०१८ मध्ये लग्न केले होते.
मात्र, लग्नाच्या ७ वर्षांनंतर जुलै २०२५ मध्ये सायनाने ते दोघं विभक्त होत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते.
सायना आणि कश्यप अनेक वर्षांपासून एकत्र होते, पण अचानक त्यांनी विभक्त होत असल्याचे सांगितल्याने अनेकांना धक्का बसला होता.
मात्र, त्यानंतर २ ऑगस्ट २०२५ रोजी सायनाने ते दोघं परत एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
सायनाने कश्यपसोबतचा नवा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला, ज्यात दोघं आनंदी दिसत असून ते एका निसर्गरम्य ठिकाणी उभे असल्याचे दिसत आहेत.
सायनाने हा पोटो शेअर करताना लिहिले की 'कधीकधी दुराव तुम्हाला एखाद्याच्या उपस्थितीची खरी किंमत शिकवतो. आम्ही पुन्हा एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय'
सायना-कश्यप नातं निभावण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहेत, हे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.