छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटर मुळे शेतातील पिकांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत प्रशासन दखल घेत नाही. म्हणून अगरवाडगाव, गळनिंब आणि कायगाव येथील शेतकरी जलसंपदा आणि जिल्हा प्रशासन विरोधात आक्रमक झाले आहेत. या तीन गावातील गावकरी जलसमाधी आंदोलनासाठी जायकवाडी धरणाच्या पाण्यात उतरले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचे पाणी ८० टक्के झाल्यानंतर दरवर्षी गंगापूर तालुक्यातील अगरवाडगाव, गळनिंब आणि कायगाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या असंपादित जमिनीमध्ये घुसून उभ्या पिकांचे नुकसान होते. मागील अनेक वर्षांपासून हे शेतकरी आंदोलन करून न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे प्रशासन मात्र कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
Mumbai to Pune : मुंबई-पुणे फक्त ९० मिनिटांत, तिसऱ्या एक्सप्रेस वेचा आराखडा तयार, पाहा नेमका मास्टरप्लॅनजमीन संपादित करण्याचे आदेश
शेतकऱ्यांनी जमिनीचे भूसंपादन करून नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हाधिकारी, जायकवाडी पाटबंधारे विभाग, मंत्रालय, उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागितली. परंतु, अद्याप यश आले नाही. दरम्यान उच्च न्यायालयाने १९ एप्रिल २०२३ रोजी संबंधित शेतकऱ्यांचे भूसंपादनाबाबत आदेशही दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर २०२३ रोजी गोदावरी खोरे महामंडळ, जायकवाडीसह सर्व संबंधित विभागांना आदेश काढून जमिनींचे भूसंपादन तत्काळ करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु दखल घेतली नाही.
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गांवर पाळावी लागणार वेग मर्यादा; एक किमी अंतरावर बसणार स्पीड सेन्सर कॅमेरा, उल्लंघन केल्यास दंडशेतकऱ्यांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन
जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने ऊस, मोसंबीच्या बागांसह खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत. दरवर्षी बॅकवॉटरमुळे अगरवाडगाव, गळनिंब व कायगाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र, जायकवाडी धरणामध्ये जमीन संपादित केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. या शेत जमिनी संपादित करून नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी आज शेतकरी सामूहिक जलसमाधी आंदोलन करीत आहेत.