त्वचेच्या आजारात गुणकारी पतंजलीचे हे औषध, कसे वापरावे जाणून घ्या
GH News August 05, 2025 12:09 AM

त्वचेचे आजार लोकांना खूपच त्रासदायक ठरतात. परंतू पतंजलीचे एक औषध या त्वचेच्या आजारांवर रामबाण ठरणारे आहे त्वचेचे विकार उदा.पिंपल्स, डार्क स्पॉट्स, त्वचेचे रंग फिका पडणे, स्कीनवर रॅशेस आणि खाज सुटणे यावर नैसर्गिक उपायांचा शोधात लोक आहेत. पतंजलीची दिव्य कायाकल्प वटी या सर्व त्वचा रोगांना नियंत्रणात आणते. खासकरुन युवावस्थेत हार्मोन्सच्या बदलामुळे चेहरा, पाठ आणि छातीवर पिंपल्स, व्हाईटहेट्स वा ब्लॅकहेट्स निघतात. त्यात त्वचेला खाज येणे, कोरडेपणा, लाल होणे आणि जळजळ होते. हे अलर्जी किंवा इम्युन सिस्टीमची समस्या असू शकते. या समस्यांसाठी हे औषध फायदेमंद आहे.

पतंजली संशोधन संस्था, हरिद्वारच्या संशोधनात या औषधाला त्वचेसाठी लाभदायक म्हटले आहे. पतंजलीच्या दिव्य कायाकल्प वटी या सर्व समस्या लक्षात घेऊन तयार केली आहे. हे एक आयुर्वेदिक औषध असून टॅबलेटच्या स्वरुपात मिळते. यास महिला आणि पुरुष दोन्ही घेऊ शकतात. या आयुर्वेदिक टॅबलेटमध्ये १८ जडी बुटी यांचे मिश्रण आहे. यात कडुनिंब, आवळा,मंजिष्ठा,गुगलवेल, चंदन, करंज आणि अन्य लाभदायक तत्वं आहेत. हे सर्वघटक आपले रक्त शुद्ध करतात आणि त्वचा देखील आतून आरोग्यदायी बनवतात.

कसे काम करते दिव्य कायाकल्प वटी

रक्त शुद्धीकरण (Blood Detox)– आत जमलेले विषारी तत्व (टॉक्सिन्स) त्वचेच्या समस्येचे मुळकारण आहेत. ही वटी रक्त शुद्ध करुन त्वचेला निरोगी बनवते.

पिंपल्स आणि पुळ्यांपासून आराम – कडूनिंब आणि हळद सारख्या एंटीबॅक्टीरियल तत्वे त्वचेतील बॅक्टीरियांना नियंत्रित करतात, त्यामुळे पिंपल्स आणि ब्रेकआउट्समध्ये कमी येते

त्वचेचा रंग – रुप सुधारते, मंजेष्ठा आणि हळदीचे गुण त्वचेचे डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन आणि शुष्क रखरखीतपणा घालवून तजेली बनवते

एक्झिमा, स्कॅबीज आणि ल्यूकोडर्मामध्ये लाभकारी – सूज आणि खाजेच्या लक्षणांना कमी करण्यात महत्वाची भूमिका असते. अनेक आयुर्वेदिक संशोधनात Psoriasis-सारख्या सूजेत आराम देते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचा ठिक करते– आंवला आणि गुळवेल सारखे तत्व शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते त्यामुळे त्वचा लवकर पूर्ववत होते.

आणखी सावधानता कशी बाळगाल

पतंजलीच्या दिव्य कायाकल्प वटीच्या दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यासोबत जेवणानंतर घ्याव्यात वा आयुर्वेदाचार्याच्या सल्ल्याने घ्याव्यात. सर्वसाधारणपणे २ ते ३ महिने सेवन करणे लाभदायक ठरु शकते. गर्भवती वा स्तनपान करणाऱ्या मातांनी वा किंवा उपचार सुरु असलेल्या लोकांनी सल्ल्याशिवाय घेऊ नये.

काळजी घेण्याची बाब

जर जुलाब, पोटाची समस्या वा एलर्जी असेल तर सेवन बंद करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पाकिटांवर निर्देश आणि लेबलला लक्षपूर्वक वाचावे आणि निर्धारक मात्रेपेक्षा अधिक घेऊ नये. लहान मुले किंवा विशेष आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. औषधाचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.

हेल्दी लाईफस्टाईलने लाभ

दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, म्हणजे टॉक्सीन्स बाहेर पडतील. संतुलित आहार घ्यावा, फळे, भाज्या, नट्स आणि गुणकारी तेलांचा समावेश करावा. जंक फूड आणि जास्त साखर खाण्यापासून दूर राहावे, कारण याने त्वचे विकार आणखी वाढतात. रोझ मिल्क, सर्वसाधारण स्कीन रुटीन पाळावे, क्लेंज,मॉईश्चरायझर, सनस्क्रीनचा वापर करावा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.