अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात भारताने अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला. या विजयात मोहम्मद सिराजचा मोलाचा वाटा राहिला. त्याने दुसऱ्या डावात पाच गडी बाद केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मोहम्मद सिराजने विजयी खेळी केल्यानंतर कोट्यवधि चाहत्यांचं मन जिंकला. तसेच त्याच्या एका कृतीने चाहत्यांचं मन भरून आलं आहे. मोहम्मद सिराजने सामना संपल्यानंतर दिनेश कार्तिकसोबत चर्चा केली. यावेळी त्याने ओवल कसोटी जिंकण्याचा प्लान सांगितला. या सामन्यात विजयासाठी काय योजना होती याबाबत सांगितलं. इतकंच काय तर या सामन्यानंतर मोहम्मद सिराज भावुक देखील झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला रवींद्र जडेजाची एक गोष्ट आठवली आणि डोळ्यात अश्रू तरळले. विजयानंतर मोहम्मद सिराज चेंडू घेऊन मैदानात फिरला. इतकंच काय तर सिराजच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही झाली.
सिराजला अश्रू अनावर होण्याचं कारण होतं ते म्हणजे रवींद्र जडेजाचे शब्द जे त्याने लॉर्ड्स कसोटीदरम्यान वापरले होते. सिराजने खुलासा करत सांगितलं की, जेव्हा लॉर्ड्स कसोटीत फलंदाजी करत होतो तेव्हा जडेजाने त्याला वडिलांची आठवण करण्यास सांगितलं. पण सिराज या सामन्यात काही करू शकला नाही. उलट विकेट गेल्याने सामना 22 धावांनी गमवावा लागला होता. पण ओव्हल कसोटीत सिराजने कमाल केली. सिराजने शेवटची विकेट काढली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
The man of the moment! 🙌🏻#MohammadSiraj takes us through the nervy moments & how he stood strong winning it for #TeamIndia with a fifer after the dropped-catch! 🥹#ENGvIND #INDvENG pic.twitter.com/fTqeauBlJC
— Star Sports (@StarSportsIndia)
मोहम्मद सिराजचा एक डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. त्यात त्याने i believe on jassi bhai असं बोलला होता. पण सिराजने यावेळी हा डायलॉग बदलला आणि i believe on Myself असं केलं. सिराजने सांगितलं की मला स्वत:वर विश्वास होता की मी सामना जिंकवू शकतो. सिराजने सांगितलं की, ‘मी फक्त एकाच ठिकाणी गोलंदाजी करू पाहत होतो. जास्त काही बदल करण्याची गरज नव्हती. बस एका टप्प्यावर चेंडू आत बाहेर नेण्याची योजना होती.’ सिराजने एक इमोजी डाउनलोड केला होता त्यात बिलीव म्हणजेच विश्वास असं लिहिलं होतं.