अभिनेत्री श्वेता मेनने बॉलिवूडच्या 30 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलय. तिच्याविरुद्ध एर्नाकुलम सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चित्रपटात अश्लीलता दाखवल्याचा आणि नियमांच उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर पावलं उचलण्यात आली आहेत. ‘पलेरी माणिक्यम’ ते ‘रत्निर्वेदन’मध्ये अश्लील सीन दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. त्या शिवाय एका कंडोम ब्रांडच्या जाहीरातीमध्ये सुद्धा अभिनेत्रीने असच केलय.
श्वेता मेननने बॉलिवूड सोबतच साऊथच्या चित्रपटातही काम केलय. तिच्याविरुद्ध एका व्यक्तीने तक्रार नोंदवलेली. पोलिसांना कारवाई करायला सांगितलेलं. श्वेता मेनन विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
अभिनेत्रीने पैशांसाठी अश्लीलत पसरवण्याच काम केलय असा तिच्यावर आरोप आहे. अभिनेत्रीला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. केरळ उच्च न्यायालयाने अभिनेत्री विरुद्धच्या या प्रकरणाला स्थगिती दिली आहे. सध्या तिच्याविरुद्ध कुठलीही गुन्हेगारी कार्यवाही चालणार नाही.
श्वेता मेनन 51 वर्षांची आहे. चित्रपटात बोल्ड सीन देण्यासाठी ती ओळखली जाते. तिचा जन्म 23 एप्रिल 1974 रोजी चंदीगडमध्ये झाला. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केलेल्या श्वेताने मल्याळम सिनेमात सुद्धा काम केलय.
श्वेताने सलमान खानसोबत ‘बंधन’ चित्रपटात काम केलय. त्यात तिने वैशालीचा रोल साकारलेला. वर्ष 1998 साली आलेल्या या चित्रपटात जॅकी श्रॉफ, रंभा, अश्विनी भावे, मुकेश ऋषि आणि आसिफ शेख हे कलाकार होते.
बंधनमध्ये काम करणारी श्वेता याआधी अजय देवगण आणि आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘इश्क’ मध्ये दिसलेली. यात हमको तुमसे प्यार है गाण्यामध्ये तिने डान्स केलेला. हे गाणं सुद्धा खूप गाजलेलं.
श्वेताने सलमान खान, अजय देवगण आणि आमिर खान सारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केलय. त्याशिवाय तिने शाहरुख खान आणि करीना कपूर खानची फिल्म ‘अशोका’ मध्ये सुद्धा काम केलय. यात ती नंदनेश्वरीच्या रोलमध्ये दिसलेली.
51 वर्षीय श्वेता मेननने चित्रपटात काम करण्याआधी मॉडेलम म्हणूनही चांगलं नाव कमावलेलं. तिने 1994 साली मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब जिंकलेला. सक्सेसफुल मॉडल असताना तिने चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं.
श्वेताच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं झाल्यास तिचं पहिलं लग्न 2004 मध्ये बॉबी भोंसलेसोबत झालेलं. 2007 साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2011 साली तिने श्रीवल्सन मेनन सोबत दुसरं लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगी आहे.
श्वेता सोशल मीडियावर खूप Active आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. एक्ट्रेसचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन (20 लाख) पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. एक्ट्रेस अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.