रक्षाबंधन सणाच्या दिवशीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मावस भाऊ बाळराजे माळी यांचे (९ ऑगस्ट) रात्री निधन झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे चाकणकर कुटुंबियांवर आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर शोककळा पसरली आहे. बाळराजे यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदेंना जम्मू-कश्मीरचं राज्यपाल व्हायचंय - संजय राऊतएकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेकडून जम्मू कश्मीरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरासाठी शिंदे जम्मू-कश्मीरला गेले आहेत. त्यावरून शिंदेंना जम्मू-कश्मीरचं राज्यपाल व्हायचंय असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
एकटा बास! भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चागुहागर मतदारसंघात माजी आमदार नातू यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर आमदार भास्कर जाधव आणि ब्राम्हण महासंघामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. भास्कर जाधव यांनी आपल्या व्हाॅट्सअपला किती बी येऊद्या एकटा बास! असे स्टेट्स ठेवत प्रतिआव्हान दिले आहे.
प्रताप सरनाईक यांच्या विरोधात एसीबीकडे अर्जरॅपिडो कंपनीवर कारवाईचा फार्स दाखवत आपल्या मुलाच्या दहीहंडी उत्सवासाठी स्पाॅन्सरशिप मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे, असा आरोप कामगार सभेचे अध्यक्ष केशव नाना क्षीरसागर यांनी केला आहे. त्यांनी मंत्री प्रतापजी सरनाईक तसेच अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरो पुणे यांना तक्रार अर्ज देत कारवाईची मागणी केली आहे.
प्रांजल खेवलकर प्रकरणी एसआयटी स्थापन होणारएकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आले आहे. दरम्यान, खेवलकर यांच्याकडे अनेक महिलांचे व्हिडिओ सापडले आहेत. त्यामुळे महिलांचा अश्लिल आणि गैरवापर होत असल्याचे प्राथमिक अहवालत नमूद करण्यात आले आहे त्यामुळे या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
Crime Update : कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यवसायिकाची आत्महत्या; सात खासगी सावकरांविरोधात गुन्हा दाखलपंढरपुरात एका व्यावसियाकाने कर्जबाजारीपणाला आणि खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरेश मारूती कांबळे असं आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात खासगी सावकरीसह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Update : नशेच्या आहारी गेलेल्या युवकाचा आईवडिलांसह आजीवर चाकू हल्ला; बीडमधील थरारक घटना...वीस वर्षीय युवकानं आपल्या घरातील सर्वांवरच चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील परळी इथं घडली. या हल्ल्यामध्ये युवकाच्या आजीचा जागीच मृत्यू झाला, तर आई-वडील देखील गंभीर जखमी झाले. आई-वडिलांना अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. हल्लेखोर अरबाज कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Anil Bonde On Sharad Pawar : शरद पवार यांचं वक्तव्य हास्यास्पद अन् खरे देखील..; भाजप खासदार अनिल बोंडे'निवडणूक जेव्हा लढवतो तेव्हा प्रत्येकाकडे मांत्रिक येतात, तांत्रिक येतात, कोणी म्हणतात मतदारसंघ बांधून देऊ, मंत्रांनी कोणी मशीन बांधून देऊ म्हणतात, कोणी म्हणतं आम्ही मतदानावर प्रभाव टाकून देऊ, तसेच ते लोक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे गेले असतील ते की आम्ही मशीन सुद्धा बांधून देऊ. पण शरद पवारांनी तेव्हाच या लोकांना तातडीने पोलिसांकडे द्यायला हवे होते. कारण अशी फसवीगिरी करणारे जे भामटे असतात. त्या भामट्यांना पकडून देणं खऱ्या नेत्याचा काम आहे', असा टोला भाजप खासदार अनिल बोंडे यांनी लगावला.
Crime Update : गावठी पिस्तूल अन् जिवतं काडतुसासह भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्याला अटकठाणे क्राईम ब्रँच आणि बदलापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैधरित्या देशी बनावटीचे दोन पिस्तूल बाळगल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक केली. भाजपचा पदाधिकारी असलेले शरद म्हात्रे आणि त्यांचे दोन साथीदार हरेश भोपी आणि दशरथ कांबरी या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. या तिघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Beed Crime Update : बीडमधील सतीश भोसले ऊर्फ खोक्याला जामीन मंजूरसतीश भोसले ऊर्फ खोक्याविरोधात ला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत बीडच्या शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात त्याला देखील अटक झाली. सध्या तो बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळले होते. याप्रकरणी वकील राजन धसे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार शिरूर कासार इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
Raigad Poltics Update : कर्जतमधून सुधाकर घारे यांची उमेदवारी तटकरेंचा पूर्वनियोजित कट; आमदार थोरवे यांचा आरोपएकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्जत मतदारसंघात सुधाकर घारे यांची बंडखोरी, हा सुनील तटकरे यांचा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. कर्जत इथं आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. सुधाकर घारे यांना एबी फॉर्म दिला नसला, तरी सुनील तटकरे यांनी संपूर्ण राष्ट्रवादी सुधाकर घारे यांच्या मागे उभी केली होती.
Ajit Pawar : कार्यकर्त्याचा आग्रह, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फॉर्च्युनरचे पूजन...उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून पाहणी दौरा आटोपून पवार सहयोग निवासस्थानी आले. तिथं कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. एका कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीचे पूजन करण्याचा आग्रह धरला. उपमुख्मयंत्री पवार यांनी फॉर्च्यूनरचे पूजन देखील केले. पूजन केल्यानंतर वाहनाचे नियमांचे पालन करून आपण वाहन चालवावे, असा सल्ला देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्याला दिला.
Sangali Crime Update : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा साठा जप्त; 6 जणांना अटक...नशासाठी बेकायदेशीर वापरल्या जाणाऱ्या ट्रेमीमाईंड औषधी इंजेक्शनचा साठा सांगली पोलिसांनी जप्त केला आहे. 2 लाख 15 हजार किंमतीचे 558 इंजेक्शन बाटल्या जप्त करत 6 जणांना अटक केली आहे. सदरची इंजेक्शन ही ऑनलाईन मागवून ती सांगली, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या ठिकाणी ज्यादा दराने विक्री करण्यात येत असल्याचीही माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. शहरातल्या पत्रकारनगर इथं औषधी इंजेक्शन तस्करी करताना संशयिताला पकडत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
कबुरतखान्यावरून मनसेने डिवचले, संदीप देशपांडेंचा टीशर्ट चर्चेतदादरमधील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश कार्टोने दिले आहेत. मात्र, जैन समाजाने त्याला विरोध केला आहे. त्याच्या विरोधात त्यांनी मोर्चा देखील काढला. आता यात मनसेने उडी घेतली मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपला फोटो ट्विट केलं आहे. त्या फोटोमध्ये नरेस, सुरेस, परेस चड्डीत राहायचं असे लिहिलेला शर्ट संदीप देशपांडे यांनी घातलेला दिसत आहे.
Pune to Nagpur Vande Bharat train : पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखलपुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर रेल्वे स्थानकावर पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. ही वंदे भारत देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस असून तिच्यामुळे पुणे आणि नागपूर दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे.
Ajit Pawar : अजितदादा आज बारामती दौऱ्यावरराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बारामती बसस्थानक परिसरातील विकास कामांची पाहणी केली.
Srikant Shinde : काँग्रेस सरकारच्या काळात देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले - श्रीकांत शिंदेकाँग्रेस सरकारच्या काळात देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले. यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. मात्र काँग्रेसचे मंत्री भाषणबाजी करण्यात मग्न होते. काँग्रेसचे महाराष्ट्रतील तत्कालीन मुख्यमंत्री बॉलिबुडमधील लोकांना घेऊन हॉटेल ताजमध्ये गेले, दहशतवादाशी लढण्यास काँग्रेस सपशेल अपयशी ठरली, असा हल्लाबोल शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत केला. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका सभागृहात मांडली. देशाच्या सुरक्षेबाबत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही, असे खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले.
Ambernath : अंबरनाथमध्ये मनसेला खिंडारअंबरनाथमधील मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे, शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेवक स्वप्निल बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Ladaki bahin Yojna : लाडकी बहीण योजना यापुढेही चालू राहणार - मुख्यमंत्री फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना यापुढेही चालू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. लाडक्या बहिणींमुळेच राज्यात आम्ही सत्तेवर आलो. तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता आम्ही सगळे भाऊ सातत्याने कार्यरत आहोत. शिवाय लाडकी बहीण योजना यापुढेही चालूच राहील आणि योग्य वेळी मानधनातही वाढ केली जाईल, असं आश्वासनही त्यांना राज्यातील बहिणींना दिलं आहे.
Election Commission : देशातील 334 पक्षांची मान्यता रद्दकेंद्रीय निवडणूक आयोगाने काल एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यानुसार देशातील तब्बल 334 नोंदणीकृत मात्र, मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करत त्यांना निवडणूक यादीतून वगळले आहे. यात महाराष्ट्रातील 9 राजकीय पक्षांचा समावेश आहे.
Eknath Shinde : आदिवासी समाजाच्या ताटातले काढून दुसऱ्याला देणार नाहीशिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या ताटातले काढून दुसऱ्याला देण्याचे काम सरकार कधीही करणार नसल्याचं आश्वासन दिलं, तसंच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.