पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात फक्त हिंदू पर्यटकांना टार्गेट करून गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. थेट पर्यटकांना सुरूवातीला गुडघ्यावर बसण्यास सांगण्यात आले आणि धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप बघायला मिळाला. तपासामध्ये स्पष्ट झाले की, हे दहशतवादी पाकिस्तानातून आला. त्यानंतर भारताने या हल्ल्याच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशन सिंदूरवेळी नेमकं काय घडलं हे आता थेट भारतीय सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीच सांगून टाकलंय.
भारतीय सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर काय घडले आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांनी मोठी माहिती सांगितली. उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 एप्रिल रोजी सर्वोच्च लष्करी आणि राजकीय नेतृत्वाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट भूमिका घेतली.
हेच नाही तरराजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, बस…आता हे खूप झालंय…या बैठकीला आम्ही तिन्ही सेनाप्रमुख उपस्थित होतो. आम्ही पूर्णपणे सूट देण्यात आली. उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, आम्हाला राजनाथ सिंह यांनी म्हटले की, तुम्ही ठरवा काय करायचे…हाच विश्वास आमच्यासाठी अत्यंत मोठा आणि महत्वाचा होता आणि आम्ही हे सर्व पहिल्यांदाच बघितले. उपेंद्र द्विवेदी म्हणाले, यामुळे सैनिकांचे मनोबल वाढते आणि हेच कारण होते की, आमचे आर्मी कमांडर जमिनीवर जाऊन ठोस कारवाई करत होते.
त्यांनी पुढे सांगितले की, 25 एप्रिल रोजी आम्ही नॉर्दर्न कमांडमध्ये पोहोचलो. आम्ही विचार केला, योजना तयार केली, कॉन्सेप्ट तयार केली आणि कारवाई केली. 9 पैकी 7 ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आणि मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले. भारतीय सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ही सर्व माहिती आयआयटी मद्रास येथील कार्यक्रमातील भाषणात सांगितली.