दिर्बादेवी जामसंडे देवगड संघ 'भालचंद्र चषक'चा मानकरी
esakal August 12, 2025 06:45 AM

83742

दिर्बादेवी जामसंडे देवगड संघ
‘भालचंद्र चषक’चा मानकरी

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश

कणकवली, ता.११ : येथील भालचंद्र मित्रमंडळातर्फे विद्यामंदिर शाळेच्या पटांगणावर आयोजित ‘भालचंद्र चषक २०२५’ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दिर्बादेवी जामसंडे देवगड संघ विजेता ठरला. तर यंगस्टार कणकवली संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक भद्रकाली गुढीपुर संघाने पटकावले तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक गिरोबा सांगेली संघाने पटकावले.
या स्पर्धेत १४ संघांनी सहभाग घेतला. यामध्ये अष्टपैलू खेळाडू प्रथमेश पेडणेकर (यंगस्टार कणकवली), उत्कृष्ट चढाई सुशील पाटकर (दिर्बादेवी जामसंडे देवगड), उत्कृष्ट पकड सिद्धेश भडसाळे (दिर्बादेवी जामसंडे देवगड) यांना दिले. सर्व संघाना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धा कार्यक्रमावेळी माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, माजी नगरसेवक अभय राणे, युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, चिटणीस अवधूत तळगावकर, अरुण जोगळे, अमिता राणे, चानी जाधव, परेश परब, अक्षय चव्हाण, रूपेश वाळके, भालचंद्र पेडणेकर, रूपेश केळुसकर, रुचिर ठाकूर, अभि चव्हाण, चिन्मय माणगावकर, संदेश आर्डेकर, नंदू वाळके, भैया आळवे, रुदरेश लाडगावकर, किरण सावंत, दीपक देऊळकर, तुषार मोरे, शिवलिंग पाटील, उदय यादव, प्रियांका कोरगावकर, सुशांत सावंत, ओंकार हळदीवे, समीर कमलापुरे, रूपेश साळुंखे आदी उपस्थित होते. बाळू वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.