जसे खाल तसे बनाल : प्रवीणऋषीजी म. सा.
esakal August 12, 2025 11:45 AM

आपण जसं खातो तसंच आपलं मनही तयार होत असतं. ज्या प्रकारचे गुण पदार्थात असतात तसेच गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात उतरत असतात. आपल्या आरोग्यावर, विचारांवर आणि वागणुकीवर थेट परिणाम घडवत असतात. तुम्हीच अशा प्रकारचे अन्न खाल तशा प्रकारचे बनत जाल.
आहार हा केवळ पोट भरण्यासाठी नसतो, तर तो शरीर, मन आणि आत्म्याला पोषण देणारा ऊर्जेचा स्रोत असतो. भूक ही सगळ्यात मोठी व्याधी आणि सगळ्यात मोठी वेदना आहे. भूक ही केवळ शरीराची नसते, तर ती मनाची, वासनेचीदेखील असते. तसंच वेदनेचेदेखील आहे. वेदनाही केवळ शारीरिक नाही, तर ती मानसिकही असते. म्हणून आपण भूक लागल्यावर कधी आणि कसं खातो, याला खूप महत्त्व आहे. केवळ पोट भरणे हे उद्दिष्ट ठेवलं तर नुसतं पोट भरेल; पण त्यातून उत्तम स्वास्थ्य, निरोगी आरोग्य लाभणार नाही. केवळ पोट भरलेलं राहील पण भूक मात्र शमलेली नसेल. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. भूक शमवणे हे एक प्रकारे यज्ञकर्मासारखेच आहे. हे लक्षात ठेवले तर आपला आहाराविषयीचा दृष्टिकोन नक्की बदलेल. भुकेची वेदना शांत होणं हेच आपलं पहिलं लक्ष्य असलं पाहिजे.

(शब्दांकन : प्रवीण डोके)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.