घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधण्यामागे एक खास रहस्य दडलेलं आहे. हे रहस्य केवळ एक जुनी परंपरा नसून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. अनेक वर्षांपासून मीठ हे केवळ जेवण चविष्ट बनवण्यासाठी नव्हे, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी वापरले जाते.
त्यामुळेच, घरातील वातावरण शुद्ध आणि आनंदी ठेवण्यासाठी मीठ एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी घटक मानला जातो. पण मुख्य दारावर ही मिठाची पिशवी का बांधतात आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मुख्य दरवाजा हे घरात येणारी ऊर्जा आणि बाहेर जाणारी ऊर्जा यांचे केंद्रस्थान मानले जाते. मिठाची पिशवी दरवाज्यावर लावल्याने घरात येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दाराबाहेर राहते आणि सकारात्मक ऊर्जा आत येते.
दाराबाहेर मिठाची पिशवी लावल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढतो. यामुळे घरातील वाद आणि गैरसमज दूर होतात आणि शांतता टिकून राहते.
मीठ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधल्याने घरात लक्ष्मी येते. तसेच आर्थिक अडचणी दूर होतात. त्यासोबतच कर्जासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते.
जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असतील तर मिठाची पिशवी बांधल्याने ते दोष कमी होण्यास मदत होते. यामुळे घरातील ऊर्जा चांगली राहते. तसेच दोषामुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध राहू आणि केतू या ग्रहांशी आहे. मीठ नकारात्मक शक्तींना दूर ठेवते. त्यामुळे मिठाची पिशवी बांधल्याने ग्रहदोषांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतात आणि मानसिक शांतता मिळते.
पण ही पिशवी वेळोवेळी बदला. जुने मीठ काढून ते वाहत्या पाण्यात टाका. यानंतर नवीन मीठ असलेली पिशवी पुन्हा बांधा. यामुळे मिठाची ऊर्जा नेहमी ताजीतवानी राहते. त्यामुळे घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.