असं म्हणतात की, महिलांची बॅग त्यांची मैत्रीण असते. कारण कुठेही जाताना त्या बॅगसोबत घेऊन जातात. महिलांकडे विविध प्रकारच्या बॅगचे कलेक्शन सुद्धा असते. फिरायला जाताना वेगळी, ऑफिसला जाताना वेगळी अशा विविध बॅग्स.. ऑफिसच्या बॅगविषयी बोलायचे झाल्यास हल्ली शोल्डर बॅग नेणे अधिक पसंत केले जाते. कारण शोल्डरमुळे स्टायलिश आणि ट्रेंडी लूक मिळतो. पण, तुम्हाला हे माहिती आहे का? शोल्डर बॅगमुळे हाडांच्या दुखण्याला आमंत्रण मिळू शकते.
बाजारात शोल्डर बॅग विविध रंगाच्या, आकाराच्या मिळतात. आवडीनुसार त्यांची खरेदी केली जाते. पण, या बॅगेमुळे पाठ आणि मानदुखीला आमंत्रण मिळते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. या एका पट्ट्याच्या, खांद्याला अडकवायच्या शोल्डर बॅग तुम्हाला फॅशनेबल लूक देतात खरं पण, यामुळे हळूहळू स्नायूंवर ताण येतो आणि हाडांचे दुखणे सुरू होते.
उद्भवणाऱ्या समस्या –
- एकाच खांद्यावर बॅग जास्त वेळ ठेवल्यास स्नायू ताणले जातात. स्नायू ताणले गेल्याने वेदना सुरू होतात. तसेच सांध्यांमध्येही दुखणे जाणवू शकते.
- जास्त वजनाची बॅग एकाच खांद्यावर बराचवेळ घेतल्यास पाठीच्या कण्याचे संतुलन बिघडते, ज्यामुळे मणक्याला त्रास होऊ शकतो.
- बॅगेच्या वजनामुळे मानेच्या स्नायूंवर ताण येतो आणि मानदुखी सुरू होते.
- सतत एकाच बाजूला बॅग लावल्याने शरीराची ठेवण बदलण्याची शक्यता असते. ज्यामुळे चालताना आणि उभे राहताना त्रास होऊ शकतो.
- शोल्डर बॅगेमुळे फ्रोजन शोल्डरचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे खांद्याची हालचाल कमी होते.
काय काळजी घ्याल?
- बॅगेचे वजन कमी ठेवा. बॅगेत अनावश्यक गोष्टी न ठेवता गरजेचे सामान ठेवावे.
- बॅग सतत एकाच खांद्यावर न ठेवता दोन्ही खांद्यावर ठेवावी.
- तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण, शोल्डर बॅग केमरेला टेकवून सतत ठेवल्यास पाठीवर ताण येतो.
- शोल्डर बॅग वापरायची असल्यास पातळ पट्ट्यांची न वापरता जाडसर पट्ट्यांची वापरावी, जेणेकरून स्नांयूवर ताण येणार नाही.
हेही पाहा –