आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची अयोध्या सहल
esakal August 14, 2025 11:45 AM

पिंपरी, ता.१३ : आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची अयोध्या सहल उत्साहात पार पडली. यात ९१ महिला व पुरुष सहभागी होते. सहलीचे नियोजन, निवास, भोजन आणि अन्य व्यवस्था तुषार शिंदे यांनी पाहिली. सहलीत गंगा-यमुना-सरस्वती नद्यांचा संगम, बोटीतून प्रवास, स्नान, धार्मिक कार्ये, कालभैरव, गंगाआरतीचा अनुभव ज्येष्ठांनी घेतला. काशी विश्वेश्वर, लोटे मारुती दर्शन घेऊन हा चमू अयोध्या येथे गेला. ‘‘समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी जीवनात आनंदी राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करून त्यास अध्यात्माची जोड देण्याची आवश्यकता आहे. तसेच सतत क्रियाशील राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते,’’ असा सल्ला अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांनी दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.