कऱ्हाड: हवाई वाहतुकीची वाढती गरज विचारात घेऊन येथील विमानतळाचे विस्तारीकरण करण्याची कार्यवाही शासनाच्या माध्यमातून विमानतळ विकास कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान विमानतळाच्या नव्या आखणीसाठी एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार जागतिक पातळीवरील सल्लागार कंपनीही नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १७५ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणीकऱ्हाड हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून कोकण, कर्नाटक, सोलापूर, तासगावला जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे असल्यामुळे या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिले विमानतळ सुरू झाले आहे. या विमातनळावर राष्ट्रपती, अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, उद्योजक, खासदार, आमदार, अभिनेते यांच्यासह मान्यवर सातत्याने ये- जा करतात. त्यामुळे या विमानतळाची गरज अधोरेखित झाली आहे. पुढील काळात वाढणारी हवाई वाहतूक लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी त्याची कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानंतर या विमानतळाच्या विस्तारीकरणाची कार्यवाही सुरू झाली. मध्यंतरी त्याला जमिनी जात असल्याने विरोध झाला. मात्र, प्रशासनाने टप्प्याटप्प्याने त्याची कार्यवाही सुरू ठेवली. सध्या भूसंपादनाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे आग्रही आहेत. त्यामुळे विस्तारीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. दरम्यान महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून विस्तारीकरणास जागा उपलब्ध होणार असल्याने विमानतळाची नवी आखणी केली जाणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाकडून निविदा काढण्यात आली आहे. त्या कंपनीच्या नियुक्तीनंतर विमानतळाची नवीन आखणी करण्यात येणार आहे.
विमान हायजॅक झाल्यास आयसोलेशन बे
विमानात तांत्रिक बिघाड वा ते हायजॅक झाल्यास तातडीने उतरण्यासाठीचीही सोय येथील विमानतळावर करण्यात येणार आहे. त्यासाठी आयसोलेशेन बे उभारण्यात येईल. त्यात संबंधित विमानाची सुरक्षितरीत्या तपासणी केली जाण्याची व्यवस्था विकसित करण्यात येईल. त्यासाठीही संबंधित निविदेत तरतूद करण्यात आली आहे.
नवीन आखणीत याचा समावेश* टर्मिनल बिल्डिंग
* एटीसी टॉवर
* हायपॉवर वीज उपलब्धतेची सोय
* पाणी निचऱ्यासाठी अत्याधुनिक गटार लाइन
* १७०० मीटर लांबीची धावपट्टी
* नाईट लँडिंगसाठी लाइटची सोय
* गरजेनुसार पाणीपुरवठा
* सुरक्षा यंत्रणेसाठी आवश्यक सुविधा
* रनवेचे जागतिक दर्जानुसार मार्किंग
Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवड विमानतळावर अशी होईल सोय* पुणे- कोल्हापूर दरम्यानचे मध्यवर्ती विमानतळ कार्यान्वित होईल
* दिवस-रात्र विमाने उतरण्याची होणार सोय
* मोठे विमान उतरणार असल्याने मालवाहतूक सुरू होऊ शकते
* मंत्री, लोकप्रतिनिधींसह उद्योजक, अभिनेत्यांची होणार सोय
* प्रवासी सेवा सुरू होण्याची भविष्यात शक्यता