दौंडमध्ये अल्पवयीन मुलाकडून आईच्या प्रियकराचा खून
मध्यरात्री इंदिरानगर भागात कोयत्याने सपासप वार
मृत प्रविण पवार अवैध जुगार व्यवसायाशी संबंधित
आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात, बाल न्यायालयात प्रक्रिया सुरू
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मध्यरात्री धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यातील बाजार तळाजवळील इंदिरानगर भागात एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईच्या प्रियकराचा निर्घृणपणे हत्या केली. प्रविण दत्तात्रेय पवार (वय ३५, रा. इंदिरानगर, बाजारतळाजवळ, दौंड) असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास प्रविण पवार याचा हत्या करण्यात आली. पवार यांचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधाविषयी त्या महिलेला असलेल्या मुलाला प्रचंड राग होता. यावरून अल्पवयीन मुलगा आणि प्रविण यांच्यात यापूर्वी देखील अनेकदा वाद झाले होते. महिलेला व मुलाला वारंवार सांगूनही पवार याने हे संबंध तोडले नाहीत. त्यामुळे मुलाच्या मनात पवारविषयी प्रचंड संताप साचला होता.
Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...घटनास्थळाच्या सुमारास, मध्यरात्री प्रविण पवार इंदिरानगर येथे आला असता पुन्हा त्याचा त्या अल्पवयीन मुलाशी वाद झाला. वाद चिघळताच संतापलेल्या मुलाने कोयता उचलला आणि पवारवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. डोक्यावर, चेहऱ्यावर, हातांवर आणि शरीरावर सलग वार झाल्याने प्रविण पवार जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
Jalna Crime : भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! ७ वर्षीय चिमुरडीवर १४ वर्षीय चुलत भावाकडून अत्याचारहत्या करून झाल्यानंतर अल्पवयीन मुलाने कोणतीही भीती न बाळगता स्वतःच पायी चालत दौंड पोलिस ठाण्याकडे निघाला होता. मात्र, पोलिसांना आधीच घटनेची माहिती मिळाल्याने त्यांनी अर्ध्या रस्त्यात त्याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात उभे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलंमृत प्रविण पवार हा स्थानिक पातळीवर मटका आणि चक्री जुगार यांसारख्या अवैध व्यवसायांशी संबंधित असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गुंतागुंत निर्माण झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे दौंड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील अनैतिक संबंध, वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अल्पवयीन मुलांच्या मानसिक स्थितीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.