तुमच्यापैकी अनेकांनी 2001 साली आलेला अक्षय कुमार आणि बॉबी देओलचा ‘अजनबी’ चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात दोघे एकारात्रीसाठी बायको एक्सचेंज करतात. पण खऱ्या आयुष्यातही काही जण असे प्रकार करतात. अशी अनेक प्रकरणं समोर येत असतात. बिहारच्या दरभंगामध्ये एका मेहुणीने नवऱ्याऐवजी भावोजीला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवडलं. नवरा सुद्धा तिला या बद्दल काही बोलला नाही. उलट त्याने मेहुणीला एक्सचेंज ऑफर दिली.
कमतौल पोलीस ठाणे क्षेत्रात एक गाव आहे. इथे राहणाऱ्या संतोषच नेहासोबत लग्न झालेलं. संतोष मजुरी करायचा.
त्यासाठी तो पुण्याला गेलेला. दोघांना दोन मुलं आहेत. त्यांचा खर्च भागवण्यासाठी संतोष पुण्यात दिवस-रात्र मेहनत करायचा. घरी तो कमी वेळ यायचा. याचा परिणाम त्यांच्या दाम्पत्य जीवनावर झाला. नेहा घरी एकटी राहून कंटाळायची. आपला वेळ घालवण्यासाठी कधी ती मुलांना घेऊन माहेरी तर कधी चुलत बहिण पूजाच्या घरी जायची.
दोघांनी अनेक रोमँटिक फोटो काढले
पूजाच प्रवेश दाससोबत लग्न झालेलं. पूजा आणि प्रवेशला सुद्धा दोन मुलं आहेत. या दरम्यान नेहा आणि प्रवेशमध्ये कधी अफेअर सुरु झालं, कोणाला कळलं नाही. आता नेहा जास्तवेळ माहेरीच असायची. फोनवर दिवसभर प्रवेशशी बोलत बसायची. प्रवेशही नेहाला भेटण्यासाठी माहेरी यायचा. दोघांनी अनेक रोमँटिक फोटो काढले. वेळेबरोबर दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढत गेले. आता सोशल मीडियावर दोघे परस्परासोबत फोटो टाकू लागले.
नेहा तिची बहिण पूजाच्या घरी गेलेली
नेहाचा नवरा संतोषने जेव्हा हे फोटो पाहिले, तेव्हा त्याला संशय आला. तो लगेच पुण्याहून घरी निघून आला. तो सासरी बनसारा येथे गेला, त्यावेळी समजलं की, नेहा तिची बहिण पूजाच्या सिनुआरा येथे गेलीय. संतोष दास तिथे गेला. नेहाला त्याने घरी यायला सांगितलं. नेहाने नकार दिला. नवऱ्यासोबत जाण्यास नकार दिला. भावोजींसोबतच राहणार म्हणून ती हट्टाला पेटली.
‘तर तू माझ्यासोबत चलं’
पूजा सुद्धा आपली बहिण नेहाच हे रुप पाहून हैराण झाली. ती बोलली की, मी नेहाला माझी सवत बनवायला तयार आहे. आम्ही एडजेस्ट करु. पूजाच म्हणणं आहे की, संतोष नेहाची नीट काळजी घेत नाही. म्हणून दोघीं बहिणी एकाच नवऱ्यासोबत रहायला तयार आहेत. नेहाचा नवरा संतोषला या बद्दल विचारलं, तेव्हा त्याने हैराण करणारं उत्तर दिलं. “नेहा जर इथे प्रवेशसोबत राहणार असेल, तर पूजाने त्याच्यासोबत यावं, कारण त्याची दोन मुलं आहेत. त्यांची देखभाल कोण करणार?” कुठल्याही बाजूने अजून पोलीस ठाण्यात धाव घेतलेली नाही. पण हा कौटुंबिक वाद चर्चेचा विषय बनलाय.