भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Saam TV August 17, 2025 07:45 AM
  • नंदूरबार जिल्ह्यात भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बुलढाण्यात पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

  • वळवी यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला नंदूरबारमध्ये आणखी बळकटी मिळणार आहे.

  • अलीकडेच बाबाजानी दुर्राणी यांच्यासह इतर नेत्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अनेक काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेशसोहळा संपन्न झाला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. वळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला बळकट मिळणार आहे.

बुलढाण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यास आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. वसंत पुरके, प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, बुलढाणा शहराध्यक्ष दत्ता काकस, इरफान पठाण यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पद्माकर वळवी यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले आहे. पद्माकर वळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आनंद व्यक्त केला आहे. 'माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच नंदूरबार येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. त्यांच्या सहका-यांनाही काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश देण्यात येईल', असं सपकाळ म्हणाले.

Accident : मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जाणार होते, त्याआधीच भीषण अपघात; विद्यार्थ्याचा मृत्यू, आईवडिलांचा रस्त्यावरच आक्रोश

'पद्माकर वळवी यांच्या काँग्रेस प्रवेशाने नंदूरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणखी ताकद मिळेल. काँग्रेसचा विचार हाच सर्वांना सोबत घेऊन जाणारा तसेच लोकशाही आणि संविधान अबाधित राखणारा पक्ष आहे. इतर पक्षातूनही आणखी अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ इच्छूक आहेत', असेही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी स्पष्ट केलं.

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. मागील आठवड्यात परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी हजारो समर्थकांसह काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह इतर पक्षातील नेत्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.