नांदेडमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झालंय. नांदेडमध्ये घराची भिंत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. घराची भिंत कच्च्या मातीची होती. ती कमकुवत झाल्यानं मुसळधार पावसानंतर कोसळली. या भिंतीच्या मलब्याखाली अडकून जोडप्याचा मृत्यू झाला.
नांदेडच्या कंधार तालुक्यातल्या कोटबाजार इथं भिंत कोसळून दुर्घटना घडलीय. शेख नासेर शेख आमिन आणि त्यांची पत्नी शेख हसीन शेख नासेर असं मृत्यू झालेल्या जोडप्याचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटलाय.
Pune : पुण्यात मद्यधुंद चालकानं डीसीपींच्या गाडीला दिली धडक, मुलगी जखमी; दोघांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखलशेतकऱ्यांचं सततच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय. त्यातच कोटबाजार इथं घराची भिंत कोसळून जिवीतहानी झाल्याची घटना घडलीय. कच्च्या मातीची भिंत असल्यानं सततच्या पावसाने ती कमकुवत झाली होती. रात्रभर पडलेल्या पावसामुळे भिंत कोसळली आणि घरात असलेल्या दाम्पत्याच्या अंगावर कोसळली. भिंतीच्या मलब्याखाली अडकून दाम्पत्याचा गाढ झोपेतेच मृत्यू झाला.
ग्रामपंचायत सदस्य असलेल्या हसीना बेगम या त्यांच्या पतीसोबत कच्च्या विटांचं बांधकाम असणाऱ्या पत्र्याच्या घरात झोपल्या होत्या. दोघांना घरकुल मंजूर झालंय. पण सरकारकडून हप्ता मिळालेला नाही. यामुळे घरकुल योजनेचं काम रखडलं होतं. शेवटी पत्र्याच्या घरातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.