महाराष्ट्र सरकारने HSRP नंबरप्लेट बसवण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली.
१ डिसेंबरपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई होणार.
पुनर्नोंदणी, परवाना नूतनीकरण यांसारख्या सेवा HSRP शिवाय थांबवण्यात येणार.
वाहनधारकांना अंतिम मुदतीपूर्वी HSRP बसवण्याचे आवाहन.
HSRP नंबरप्लेटसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्यासाठी अंतिम मुदतवाढ दिली आहे. HSRP नंबरप्लेट बसवण्याची सुरूवातीची मुदत ३१ मार्च २०२५ होती. त्यानंतर मुदतवाढ करत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत संधी देण्यात आली होती. आता पुन्हा मुदत वाढ करत HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत HSRP नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रलंबित स्थापना, नियुक्ती उपलब्धतेतील विलंब, ग्रामीण फिटमेंट केंद्रे उशिरा उघडणे, काही केंद्रे बंद होणे, नागरिकांच्या जोरदार मागण्या यासह अनेक घटकांचा विचार केल्यानंतर परिवहन विभागाने मुदतवाढीबाबतचा हा निर्णय घेतला आहे.
राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, '१ डिसेंबर २०२५ पासून विशेष अंमलबजावणी पथके ज्या वाहनांवर अद्याप एचएसआरपी नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करतील. ज्या वाहन मालकांनी ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी नियोजित अपॉइंटमेंट निश्चित केली आहे, त्यांना त्यांच्या फिटमेंट तारखेपर्यंत कारवाईतून सूट असेल."
HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तरपरिवहन विभागाच्या आदेशानुसार, एचएसआरपी नसलेल्या वाहनांसाठी विद्यमान निर्बंधांनाही अधिक बळकटी देण्यात आली आहे. एचएसआरपी नसलेल्या वाहनांच्या मालकांना मालकी हस्तांतरण आणि गहाणखत बदल यासारख्या सेवांपासून आधीच बंदी आहे. डिसेंबरपासून, पुनर्नोंदणी, वाहन सुधारणा मंजुरी आणि परवाना नूतनीकरण यासारख्या अतिरिक्त सेवा एचएसआरपी बसवल्याशिवाय थांबवल्या जातील. तपासणीदरम्यान ताब्यात घेतलेली वाहने एचएसआरपी प्लेट असल्याशिवाय सोडली जाणार नाहीत.
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑगस्टपूर्वी हे काम कराच, अन्यथा बसेल ₹१०,००० दंड'परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यापक जागरूकता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक वाहन विक्रेते, ऑटो-रिक्षा, टॅक्सी आणि बस संघटनांना बैठकींद्वारे माहिती दिली जात आहे. जेणेकरून कोणत्याही वाहन मालकाला अंतिम मुदतीची माहिती मिळेल. दंड आणि सेवा निर्बंध टाळण्यासाठी नागरिकांना अंतिम मुदतीपूर्वी HSRP बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.' असे भीमनवार यांनी सांगितले. HSRP शी संबंधित तक्रारी विभागाच्या अधिकृत ईमेल dytccomp.tpt-mh@gov.in वर पाठवता येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोठी बातमी! HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली! शेवटचा दिवस कोणता?