इंदोरी, ता. १७ ः इंदोरीतील विविध मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. विष्णू मंदिरात शुक्रवारी संग्राम महाराज केंद्रे (भंडारा डोंगर) यांची किर्तनसेवा झाली. त्यानंतर जन्म सोहळा झाला. रात्रभर भजन सेवा झाली. शनिवार सकाळी मनोहरपंत ढमाले मामा (भंडारा डोंगर) यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. हनुमान, राम आणि धर्मनाथ यांच्या मंदिरांमध्येही जन्मोत्सव साजरा झाला.
---------------------------------