परब यांच्या कार्यालयास राणेंची भेट
esakal August 18, 2025 04:45 PM

84472

परब यांच्या कार्यालयास राणेंची भेट
सावंतवाडी ः शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या कार्यालयात आमदार नीलेश राणे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी परब यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, गुरुनाथ सावंत, बंटी पुरोहित, परीक्षित मांजरेकर, प्रशांत साटेलकर, अभिजित टिळवे, रोहित नाईक, निखिल सावंत, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडीस, राकेश पवार, संकल्प धारगळकर, सत्यवान बांदेकर, अनिल सावंत आदी उपस्थित होते.
....................
84473

कॅरम स्पर्धेत फुदैल आगाचे यश
सावंतवाडी ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा येथील मिलाग्रीस हायस्कूल येथे नुकत्याच झालेल्या शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत १७ वर्षांखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या फुदैल आगा याने चौथा क्रमांक पटकावला. तो जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला प्रशालेच्या क्रीडाशिक्षिका मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ आदींनी त्याचे अभिनंदन करत जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.