सुप्रीम कोर्टाने डान्स बारवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील डान्स बार पुन्हा एकदा गजबजणार आहेत. 2005 पासून महाराष्ट्रात हे डान्स बार बंद होते. एक काळ असा होता जेव्हा मुंबईतील डान्स बार रात्रभर गजबजलेले असायचे आणि येथे काम करणाऱ्या बार गर्ल्सवर नोटांचा वर्षाव होत असे. मुंबईच्या अंधेरी परिसरातील रहिवासी असलेल्या तरन्नुमने वयाच्या 16व्या वर्षापासून डान्स बारमध्ये नाचण्यास सुरुवात केली होती. तरन्नुम खान नावाच्या या बार बालाने खूप प्रसिद्धी आणि पैसा कमावला होता. तरन्नुमला देशातील सर्वात श्रीमंत बार बाला म्हणूनही ओळखले जाते. पण ती या व्यवसायात कशी आली? आणि का आली? चला जाणून घेऊया…
तरन्नुम खान हे एकेकाळचे अतिशय प्रसिद्ध नाव होते. सर्वात श्रीमंत बार बाला म्हणून तिची ओळख झाली होती. पण सुरुवातीली तरन्नुमला गुजरा करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला होता. तरन्नुमचे वडील एक छोटेसे दुकान चालवत होते. अगदी जेमतेम कुटुंबाचा गुजारा यातून होत असे. 1992 मध्ये झालेल्या दंगलीत तरन्नुमचे घर आणि दुकान लुटले गेले. त्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना दोन-वेळचे पोटभर अन्नही मिळत नव्हते. या सगळ्या परिस्थितीचा तरन्नुमच्या वडिलांवर मोठा परिणाम झाला. त्यांचे अचानक निधन झाले. हार्ट अटॅकने निधन झाल्याची माहिती समोर आली होती.
वाचा: तेलगीने डान्सबारमध्ये तमन्ना भाटियावर उडवले करोडो रुपये? सर्वात श्रीमंत बार गर्लशी काय आहे कनेक्शन?
घरच्या बिकट परिस्थितीमुळे डान्स बारमध्ये काम
घरच्या बिकट परिस्थितीमुळे वयाच्या 16व्या वर्षी तरन्नुमला डान्स बारमध्ये काम करण्यास भाग पडले. मुंबईच्या दीपा बारमध्ये काम करताना काही काळातच तरन्नुम खूप प्रसिद्ध झाली. तिचा डान्स पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येऊ लागले. तरन्नुमवर एका रात्रीत लाखों रुपये लुटवले जाऊ लागले आणि काही दिवसांतच ती मुंबईची करोडपती बार डान्सर बनली. 2005 मध्ये महाराष्ट्र सरकारने डान्स बार बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तरन्नुमच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आणि तिच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा झाला.
तेलगीमुळे ती बनली मुंबईची सर्वात श्रीमंत बार गर्ल
तेलगीने अटकेनंतर झालेल्या चौकशीत कबूल केले की, त्याने दीपा बारमध्ये एका मुलीवर लाखो रुपये उधळले होते. बारनेही याची पुष्टी करत सांगितले की, “तेलगी इथे आला होता खरा, पण त्याने 93 लाख रुपये उधळले नाहीत. पण खरंच खूप पैसे खर्च केले होते.” काही लोक असेही म्हणतात की तेलगीमुळेच तरन्नुम काही दिवसांतच मुंबईची सर्वात श्रीमंत बार गर्ल बनली. तिच्या माहितीतील उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि संपत्तीतील गुंतवणुकीचा खुलासा झाला होता. त्यासाठी तिला दोन महिने तुरुंगात रहावे लागले होते. 2015मध्ये तिची जामिनावर सुटका झाली. सध्या तरन्नुम कुठे आहे, काय करते? याबाब कोणतीही माहिती समोर आलेली नाही.