पिनाकेश्वर महादेव दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा ट्रॅक्टर दरीत कोसळला.
२ महिला भाविकांचा मृत्यू, तर २४ भाविक जखमी.
सोनाली आप्पा राऊत ही १४ वर्षीय मुलगी गंभीर जखमी.
अपघाताचे कारण ट्रॅक्टरचे ब्रेक फेल होणे, स्थानिक व पोलिसांनी बचावकार्य केले.
Sambhajinagar tragic accident devotees injured : देवदर्शन घेऊन परत येताना संभाजीनगरमध्ये भाविकांवर काळाने घाला घातला. कन्नडमधील खामगावमध्ये भाविकांचा ट्रॅक्टर पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगराच्या दरीत कोसळला. या दुर्दैवी अपघातात दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदतकार्य करत जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समजतेय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील खामगाव येथील ट्रॅक्टर पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगराच्या घाटातील दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. तर २४ भाविक जखमी झाल्याची घटना रविवारी सांयकाळी घडली. कांताबाई नारायण गायके (५० रा.खामगाव ता.कन्नड), कमाबाई जगदाळे (६५ रा.जानेफळ ता.वैजापूर) असे मृत झालेल्या महिला भाविकांची नावे आहे. तर सोनाली आप्पा राऊत (१४ रा.खामगाव) हिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Pune :"तो" नामांकित पब आणखी अडचणीत! "ड्राय डे'ला मद्यविक्री, पोलिसांना माहिती देणाऱ्याला शिवीगाळचेतन प्रकाश कवडे (१०) प्रतिक्षा प्रकाश कवडे, (१२) माया प्रकाश कवडे, (३२) आप्पा सोपान राऊत (३५) श्रावणी आप्पा राऊत (८) वर्षा आप्पा राऊत (३२) कल्याणी राजेंद्र कवडे (२०) साई विजय कवडे ( ११) प्रतिक्षा विजय कवडे (१६) आदित्य योगेश कवडे (७) प्रगती सोमनाथ कवडे ( ११) दिलीप डिगंबर गायके (३() योगेश अशोक कवडे (३३) पंकज गोरखनाथ कवडे (३५) विजय दादा कवडे (४२) पारसनाथ राऊत ( ४२) स्वाती पारसनाथ राऊत ( १९) मनीषा पारसनाथ राऊत (३८) बालीका दिलीप गायके (३०) माऊ दिलीप गायके ( १०) चिऊ दिलीप गायके (१२) सुवर्णा संदिप गायके (३१) मावडी संदिप गायके (९) सर्व रा.खामगाव ता.कन्नड) यांच्यावर छत्रपती संभाजीनगर, शिऊर बंगला, बोलठाण या वेगवेगळ्या ठिकाणी खासगीरुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Gold Rate Fall : सोनं स्वस्त झाले रे! आठवडाभरात किंमत ₹१९०० घसरली, वाचा २४ कॅरेट सोन्याचे नवे दरनाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी हे सर्व भाविक आप्पा राऊत यांच्या छोट्या ट्रॅक्टरमध्ये गेले होते. दर्शन आटोपून ट्रँक्टरमध्ये घरी येत असताना डोंगराच्या अगदी पायथ्यापासून येत असताना ट्रॅक्टरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् दुर्घटना घडली. ट्रॅक्टर भाविकासह थेट घाटाच्या दरीत कोसळले आणि झाडात जाऊन अडकले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोलीस हवालदार भास्कर बस्ते, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर श्रीखंडे श्रीखंडे यांनी या सर्व जखमी भाविकांना कसेबसे बाहेर काढून तातडीने प्राथमिक उपचारासाठी रूग्णालयात दाखळ केले. २३ जखमी भाविकांची प्रकृती स्थिर असून सोनाली आप्पा राऊत या १४ वर्षीय मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले