महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तडाखा, मुंबई, कोकण व घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
गेल्या २४ तासांत मुंबईत २५० मिमी पावसाची नोंद, रत्नागिरी, चिपळूण, जळगावातही जोरदार पाऊस
मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली, ग्रामीण-शहरी जनजीवन विस्कळीत
पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागांत सतत रिपरिप सुरू आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याचबरोबर कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला गेला असून रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा तडाखा, नदी-नाल्यांना पूर; रस्ते वाहतूक ठप्प, शेती पाण्याखालीगेल्या २४ तासांत अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली. रविवारी (ता. १७) सकाळपर्यंत मुंबईतील सांताक्रूझ येथे सर्वाधिक २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे २३० मिमी, चिपळूण येथे २२० मिमी, तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील दहीगाव येथे २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात पावसाची विश्रांती, विदर्भात धो धो, वाचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाजहवामान विभागानुसार, पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा जोर कायम राहणार असून, विशेषत: कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका अधिक राहील. दरम्यान, नागरिकांनी नदीकाठी, धरण परिसरात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.
Weather Update: श्रावणात रंगणार ऊन-पावसाचा खेळ; पावसाची १५ दिवस सुट्टीमुसळधार पावसामुळे शेतीला मोठा फायदा झाला असला तरी काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यभर पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.