राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आरोग्य, महिला उद्योग, जमीन नियमन आणि वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचे आधुनिक सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्काची माफी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अत्याधुनिक उपचारासोबत आयुर्वेदाचा उपयोग करून कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड या संस्थेला कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र. 697/3/6 मधील तब्बल 2 हेक्टर 50 आर शासकीय जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
CM Devendra Fadnavis : राज्यात पावसामुळे १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिकांचं नुकसान, पंचनामे कधी होणार? CM फडणवीस म्हणाले...यामुळे महिलांच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळून स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाला नियमबद्ध करण्यास मंत्रिमंडळानेमान्यता दिली आहे. या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळणार असून, जमिनींच्या वापराबाबतचे वाद मिटण्यास मदत होणार आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदांवर 29 दिवस तत्त्वावर कार्यरत असलेल्या 17 कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना स्थैर्य लाभणार असून रुग्णालय व्यवस्थापनालाही स्थिर मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.