Stock Market Opening: सेन्सेक्स 46 अंकांच्या वाढीसह उघडला; बँकिंग शेअर्समध्ये विक्री, कोणते शेअर्स तेजीत?
esakal August 20, 2025 10:45 AM
  • शेअर बाजार आज हिरव्या रंगात, सेन्सेक्स 46 अंकांच्या वाढीसह उघडला तर निफ्टी 24,900 वर आहे.

  • रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेलमध्ये 2% पेक्षा जास्त वाढ झाली.

  • ऑटो, आयटी आणि मेटल शेअर्सनी बाजारातील तेजीला आधार दिला.

Stock Market Opening Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवात झाली. सेन्सेक्स 46 अंकांच्या वाढीसह 81,319 वर उघडला तर निफ्टी 15 अंकांनी वाढून 24,596 वर उघडला. मात्र बँक निफ्टीत सुरुवातीलाच 112 अंकांची घसरण झाली आणि तो 55,622 वर उघडला.

कोणते सेक्टर वाढले?
  • ऑटो, फार्मा आणि रिअल्टी सेक्टरमध्ये विक्री दिसली

  • आयटी, मीडिया आणि मेटल सेक्टर मात्र चांगल्या तेजीसह व्यवहार करत आहेत

टॉप गेनर्स
  • Reliance

  • Bharti Airtel

  • Adani Ports

  • NTPC

  • Titan

टॉप लूजर्स
  • Power Grid

  • HCL Tech

  • Bajaj Finance

  • BEL

  • M&M

Middle Class: 'मध्यमवर्गाचा पैसा संपत आहे...', अर्थव्यवस्था मोठ्या संकटात; तज्ज्ञांनी दिला इशारा जागतिक बाजारातील घडामोडी

डाऊ 34 अंकांनी घसरला तर नॅस्डॅक 6 अंकांनी वर बंद झाला. GIFT निफ्टी 30 अंकांच्या वाढीसह 25 हजारांच्या जवळ राहिला. निक्केईत मात्र 200 अंकांची मोठी घसरण दिसली.

कमोडिटी मार्केटमध्ये क्रूड ऑइल 1.5% वाढून 66 डॉलरच्या वर पोहोचले. सोने 3,375 डॉलरवर आणि चांदी 38 डॉलरच्या आसपास स्थिर राहिली. मात्र, भारतीय बाजारात सोने 400 रुपयांनी घसरून 99,400 वर आणि चांदी 350 रुपयांनी घसरून 1,13,600 च्या आसपास बंद झाली.

राजकीय आणि आर्थिक घडामोडी
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांची बैठक घेतली. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा संदेश दिला.

  • बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना फोन करून झेलेन्स्की-पुतिन यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न होईल असे सांगितले.

Dmart Thefts: खरेदी कमी, चोरी जास्त, डीमार्टमध्ये सर्वात जास्त चोरी कोणत्या वस्तूंची होते? सेबीचे नियम बदलणार?

भांडवली बाजार नियंत्रक SEBI Non-Benchmark Indices साठी कडक नियम आणण्याच्या तयारीत आहे. नव्या नियमांनुसार प्रत्येक इंडेक्समध्ये किमान 14 शेअर्स असणे आवश्यक आहे. याचा थेट परिणाम Nifty Bank आणि Financial Services Index वर होऊ शकतो. तसेच, मार्जिन ऑब्लिगेशनची डेडलाइन 1 सप्टेंबरवरून 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

प्रायमरी मार्केटमध्ये हालचाल

आजपासून Shreeji Shipping, Gem Aromatics, Vikram Solar आणि Patel Retail चे आयपीओ उघडणार आहेत. तसेच, Bluestone Jewellery चा शेअर आज लिस्ट होणार असून त्याचा इश्यू प्राईस ₹517 आहे.

FAQs

Q1. आज शेअर बाजार का वाढला?
➡️ रिलायन्स, एअरटेल आणि आयटी-ऑटो शेअर्समध्ये मोठी तेजी दिसल्यामुळे बाजार उंचावला.

Q1. Why did the stock market rise today?
➡️ Gains in Reliance, Airtel, and strong performance in IT & auto stocks boosted the market.

Q2. आज निफ्टी कितीवर आहे?
➡️ निफ्टी 24,900 च्या आसपास टिकून आहे.

Q2. Where did Nifty close today?
➡️ Nifty held firm near the 24,900 mark.

Q3. कोणते शेअर्स सर्वात जास्त वाढले?
➡️ रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेलमध्ये 2% पेक्षा जास्त वाढ झाली.

Q3. Which stocks gained the most?
➡️ Reliance Industries and Bharti Airtel surged over 2% each.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.