Goa Minister's resignations 2025
पणजी: रखडलेल्या गोवा मंत्रिमंडळ फेरविस्ताराच्या घडामोडींना अचानक वेग आला आहे. २२ महिने मंत्रिपद सांभाळल्यानंतर पर्यावरण आणि कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा बुधवारी (२० ऑगस्ट) संध्याकाळी राजीनामा देणार आहेत. तर, रमेश तवडकर गुरुवारी (२१ ऑगस्ट) सकाळी सभापतीपदाचा राजीनामा देणार आहेत. गुरुवारी सायंकाळीच तवडकर आणि दिगंबर कामत यांचा शपथविधी होण्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
मंत्रिमंडळाच्या फेरविस्तारावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून, रमेश तवडकर आणि दिगंबर कामत गुरुवारी सायंकाळपर्यंत मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीदिल्लीतून परतल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी विद्यमान पर्यावरण आणि कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा आज (२० ऑगस्ट) संध्याकाळी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती तवडकरांना मिळणार मंत्रीपद, सिक्वेरा देणार राजीनामा; गणेश गांवकराकडे सभापती पदाची धूरा१९ नोव्हेंबर २०२३ रोजी नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेऊन सिक्वेरा यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारांपैकी मंत्रिपद मिळण्याचा पहिला मान आलेक्स सिक्वेरा यांना मिळाला होता.
१४ सप्टेंबर २०२२ रोजी आलेक्स सिक्वेरा यांच्यासह दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पक्षांतर केलेल्या गटापैकी दुसरे मंत्रिपद आता माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कामत यांनी स्वत: याबाबत माहिती देताना त्यांना मुख्यमंत्री सावंत यांनीच हिंट दिल्याचे नमूद केले. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री बुधवारी रात्री दिल्लीतून परत आल्यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत शपथविधी होण्याची शक्यता त्यांना बोलून दाखवली. यापूर्वी मंत्रिपदाच्या शर्यतीत मायकल लोबो यांचे नाव देखील आघाडीवर होते पण, ते आता मागे पडल्याचे दिसून येत आहे.
Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेधसभापती तवडकरांचा राजीनामा
रमेश तवडकर गुरुवारी सकाळी सभापतीपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एसटी नेते रमेश तवडकर यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांना मिळणाऱ्या खात्याबाबत अद्याप माहिती समोर आली नसली तरी त्यांच्याकडे महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी माहिती आहे. तवडकरांच्या जागी दुसरे एसटी नेते सावर्डेचे आमदार गणेश गांवकर यांच्याकडे सभापतीपदाचे सूत्रे दिली जाण्याची शक्यता आहे.
तीन वर्षात तीन मंत्र्यांचा राजीनामाराज्यातील भाजप सरकारमध्ये तीन वर्षात तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला. सुरुवातीला निलेश काब्राल यांचा राजीनामा घेऊन त्या जागी आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मंत्री गोविंद गावडेंना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. तर, आता २२ महिन्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळानंतर आलेक्स सिक्वेरा राजीनामा देत आहेत.