तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : भररस्त्यात तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला रबाळे पोलिसांनी दिघा येथून अटक केली आहे. ऐरोली सेक्टर-३ मध्ये गुरुवारी (ता. ७) घटना घडली होती.
एरोली सेक्टर-३ मधील गांधी गार्डनसमोरील रस्त्यावर तोंडाला मास्क, डोक्याला रुमाल बांधून आलेल्या अरविंद भोजियाने (वय ३९) भररस्त्यात एका तरुणीचा विनयभंग केला होता. या प्रकरणाची रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने तातडीने तपासाला सुरुवात केली. आरोपीने चेहऱ्यावर मास्क लावला असल्याने ओळख पटविणे कठीण होते. परिसरातील ४० ते ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गुप्त माहितीच्या आधारे दिघा येथील साठेनगर येथून आरोपाला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत त्याचा इतर गुन्ह्यातही सहभाग असल्याचे आढळून आले आहे.