Bigg Boss 19मध्ये अंडरटेकर दिसणार? शोच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पर्धक ठरणार!
Tv9 Marathi August 23, 2025 12:45 AM

सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’च्या प्रीमियरपूर्वीच अनेक चकीत करणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. शोमध्ये यावेळी काय खास असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता अशी बातमी आहे की, डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार अंडरटेकर बिग बॉसच्या १९व्या सीझनमध्ये दिसू शकतो. त्यामुळे चाहत्यांमध्ये बिग बॉसबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मीडियाच्या अहवालानुसार, अंडरटेकर शोमध्ये वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो आणि एक आठवड्यासाठी बिग बॉसच्या घरात राहू शकतात. जर या अफवा खऱ्या ठरल्या, तर ही ‘बिग बॉस’च्या इतिहासातील सर्वात खास घटना ठरेल.

‘बिग बॉस १९’ मध्ये दिसू शकतो अंडरटेकर

अंडरटेकरला बिग बॉसच्या पुढील सीझनमध्ये विशेष पाहुणा म्हणून बोलावले जाऊ शकते. मीडियाच्या अहवालानुसार, तो नोव्हेंबरमध्ये वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून घरात येऊ शकतो. तसेच ७ ते १० दिवस राहू शकतो. जरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली, तरी सूत्रांनुसार चर्चा सुरू आहे. कारण अंडरटेकरचा इतिहास आणि प्रतिष्ठा पाहता हा एक मोठा कार्यक्रम असेल. अंडरटेकरने २०२० मध्ये प्रोफेशनल कुस्तीमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो आजही कुस्ती विश्वात खूप लोकप्रिय आहे.

वाचा: 5 बायका, 12 लफडी… तरीही एकाकी होऊन मेला हा बॉलिवूडचा महाखतरनाक व्हिलन, मृतदेहही सडला…

सर्वात महागडा स्पर्धक ठरणार

बिग बॉसमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईमधील स्टार पहिल्यांदाच दिसणार नाही. यापूर्वी ग्रेट खली सीझन ४ मध्ये सहभागी झाला होता. त्याच्या लोकप्रियतेचा आणि प्रतिष्ठेचा विचार करता, अंडरटेकर हा सीझनमधील सर्वात जास्त मानधन घेणारा कंटेस्टंट ठरू शकतो. ग्रेट खलीला त्याच्या सीझनमध्ये प्रत्येक आठवड्यासाठी ५० लाख रुपये दिले गेले होते, ज्यामुळे तो शोच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक ठरला होता. अशी अपेक्षा आहे की, अंडरटेकरही ‘बिग बॉस’च्या इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक असेल.

२४ ऑगस्टपासून सुरू होणार ‘बिग बॉस १९’

‘बिग बॉस १९’ ची सुरुवात १५ स्पर्धकांसोबत होईल. त्यानंतर ३ स्पर्धकांची वाइल्डकार्ड एण्ट्री होते. त्यामुळे स्पर्धकांती संख्या १८ होईल. या सीझनची थीम ‘घरवालों की सरकार’ आहे आणि हा शो २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस सीझन १९ जिओ हॉटस्टारवर रात्री ९ वाजता स्ट्रीम होईल आणि नंतर एपिसोड्स कलर्स टीव्हीवर रात्री १०.३० वाजता दाखवले जातील. बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या संभाव्य यादीत गौरव खन्ना, अश्नूर कौर, बसीर अली, अभिषेक बजाज, सिवेत तोमर, अवेज दरबार आणि नगमा मिराजकर यांची नावे आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.