चीनची दादागिरी संपणार, भारताने दिला मोठा झटका, आता दुर्मिळ खनिजांमध्ये…
Tv9 Marathi August 23, 2025 03:45 PM

दुर्मिळ पृथ्वी खनिजांवर संपूर्ण जगाचे अर्थकारण टिकलेले असते. चीनकडे अशी काही दुर्मिळ खनिजे आहेत, ज्यामुळे कोणताही देश चीनसोबत पंगा घेण्याचा अजिबात विचार करत नाही. ही दुर्मिळ खनिजे विकून चीन मोठ्या प्रमाणात पैसा देखील कमावतो. स्मार्टफोनपासून ते इलेक्ट्रिक कार तयार करण्यापर्यंत ही दुर्मिळ खनिजे लागतात जर ती खनिजे मिळाली नाही तर या उद्योगांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. भारताकडे देखील ही खनिजे असून भारताने देखील ही खनिजे बाहेर काढण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

अमेरिकेने घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयानंतर चीनने या दुर्मिळ खनिजांची निर्यात थेट बंद केली. मात्र, भारतावरील बंदी उठवली आहे. सध्या, दुर्मिळ पृथ्वी खनिजांवर चीनची मतेमारी आहे. अमेरिकेपासून ते भारतापर्यंत प्रत्येकजण यासाठी चीनवर अवलंबून आहे. हे दुर्मिळ खनिजे वाहन उद्योगासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जर ही खनिजे मिळाली नाही तर संपूर्ण उद्योगच ठप्प होऊ शकतो.

दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या साठ्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात 70 लाख टन अशी खनिजे आहेत. भारताच्या अनेक भागात ही खनिजांची साठे आहेत. हे सर्व जमिनीत असतात. ते बाहेर काढण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागले. ते काढणे, स्वच्छ करणे, त्यानंतर शुद्ध करणे, याची एक वेगळी प्रणाली असते. सर्वात आनंदाची बाब ही आहे की, भारताने ही प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू केली आहे.

भारताकडून ही खनिजे काढण्याचे काम सुरू केले असले तरीही यासाठी वेळ लागणार आहे. यामुळे आता चीनचे दुर्मिळ खनिजांवरील जगातील मतेमारी कमी होणार. अमेरिका दखील चीनसमोर झुकण्याचे हेच सर्वात महत्वाचे कारण आहे. चीनने या दुर्मिळ खनिजांवर निर्बंध आणले तर अमेरिका इलेक्ट्रिक कार उद्योग पूर्णपणे ठप्प होईल. अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आले आहे. मात्र, चीनवर टॅरिफ लावण्यात आले नाहीये. याचे मुख्य कारण हेच आहे आणि यामुळे अमेरिका चीनसोबत पंगा घेण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.