मोठी बातमी! भारताकडून अमेरिकेला सडेतोड उत्तर, थेट ठेवले मुद्द्यावर बोट, सांगितले, नका खरेदी करू…
GH News August 23, 2025 04:14 PM

भारतावर अमेरिकेकडून टॅरिफसाठी दबाव टाकला जात असतानाच आता भारताचे परराष्ट्र मंत्री एक जयशंकर यांनी थेट मोठा आहेर अमेरिकेला देत काही प्रश्न उपस्थित केली. हेच नाही तर त्यांनी हे देखील म्हटले की, भारतापेक्षा किती तरी पट अधिक चीन रशियाकडून तेल खरेदी करतो. मग त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लावण्यात आला नाही आणि फक्त भारतावरच का? यासोबतच त्यांनी अमेरिकेचा बुरखा फाडत थेट म्हटले की, रशियाकडून अमेरिका देखील मोठ्या प्रमणात तेल खरेदी करते.

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला. मात्र, आता स्पष्ट करण्यात आले की, भारतापेक्षाही अधिक चीन रशियाकडून तेल खरेदी करतो. परराष्ट्र मंत्री एक जयशंकर यांनी नुकताच काही प्रश्नांचे उत्तरे देताना म्हटले की, आमची एक लाल रेषा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला तिला ओलांडता येत नाही. सध्या चर्चा सुरू आहे.

पण आम्हाला लाल रेषा आलांडता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे देशातील शेतकरी आणि छोटे उद्योजक आहेत, त्यामुळे या मुद्द्यावर भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्ग काढू शकत नाही. अमेरिका ज्या पद्धतीने सध्या भारतासोबत वागत आहे, त्यावर बोलताना एस जयशंकर म्हणाले, या गोष्टीला तेलाचा मुद्दा बनवला जात आहे. पण चीन हा असा देश आहे जो सर्वात जास्त रशियाकडून तेल खरेदी करतो, त्याच्यावर कोणताही टॅरिफ नाही. भारतावर निशाना साधताना ज्या काही गोष्टी पुढे ठेवल्या जात आहेत आणि आरोप केली जात आहेत.

त्या चीनबाबत का नाही? जर तुम्हाला रशिया किंवा त्यांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी काही समस्या आहेत तर खरंच नका खरेदी करू. हे लक्षात ठेवा की, युरोप आणि अमेरिका खरेदी करते. जर तुम्हाला हे आवडत नसेल तर नको खरेदी करू आमच्याकडून. एस जयशंकर यांनी स्पष्ट केले की, देशाचे हित आणि रनणीती यावर लक्ष ठेऊन त्यांनी ऊर्जा क्षेत्राबद्दल काही निर्णय घेतली आहेत. मात्र, कोणाच्याही दबावाखाली येऊन नक्कीच नाही. यावेळी त्यांनी हे देखील सांगितले की, टॅरिफच्या निर्णयानंतर भारताने कोणत्याही प्रकारचे तेल खरेदी करणे रशियाकडून बंद केले नाहीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.