भारताच्या निर्णयानं पाकिस्तानला भरणार धडकी, घेतला असा निर्णय ज्यानं…शाहबाज यांचं टेन्शन वाढलं!
GH News August 24, 2025 09:13 PM

Indian Defence Capacity : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आता देशाची सुरक्षा आणि या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या अस्त्र-शस्त्रांमध्येही मोठे बदल झाले आहेत. एका क्षणात जगाला उद्ध्वस्त करण्याची ताकद असणारी शस्त्रे आजघडीला अनेक देशांकडे आहेत. भारतही शस्त्रनिर्मितीच्या स्पर्धेत मागे नाही. भारत हा अण्वस्त्रधारी देश आहे. आता पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्राला तोंड देण्यासाठी भारत नवनव्या शस्त्रांची निर्मिती करतो. दरम्यान, आता पाकिस्तान आणि चीनचे टेन्शन वाढवणारा मोठा निर्णय भारताने घेतला आहे.

केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

अरबी समुद्रात भारताला आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. भारताच्या याच प्रयत्नांमुळे पाकिस्तान आणि चीनची चिंता वाढू शकते. एएनआयने दिलेल्या रिपोर्टनुसार केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालय तसेच माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला (एमडीएल) प्रोजेक्ट 75 इंडिया (पी-75 आय) अंतर्गत सहा अॅडव्हान्स पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी हिरवा झेंडा दाखवला आहे.

या महिन्याच्या शेवटी होणार चर्चेला सुरुवात

या पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी जर्मनीच्या थिसेनक्रुप मरीन सिस्टिम्ससोबत (टीकेएमएस) औपचारिक चर्चा करण्यासही सरकराने संमती दिली आहे. या चर्चेनंतर लवकरच भारतासाठी सहा पाणबुड्यांच्या निर्मितीच्या कामाला सुरुवात होऊ शकते, असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत या चर्चेला सुरुवात होऊ शकते, असे सांगितले जात आहे. संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्याने त्याची पुष्टी केली आहे.

प्रोजेक्ट 75 आय नेमका काय आहे?

भारताच्या संरक्षण मंत्रालयाने सरकारी मालकीच्या एमडीएलला पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी भागीदार म्हणून निवडलं होतं. या प्रोजेक्टअंतर्गत जर्मनीच्या मदतीने भारत पाणबुड्यांची निर्मिती करणार आहे. या प्रोजेक्टअंतर्गत एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) यंत्रणा असणाऱ्या एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती केली जाईल. तसेच या पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी जर्मनी एआयपी यंत्रणा वापरली जाणार असल्यामुळे त्या तब्बल तीन आठवड्यांपर्यंत पाण्यात राहू शकतात. पाणबुडी निर्मितीमध्ये भारताला स्वयंपूर्णता यावी आणि इतर राष्ट्रांवरील अवलंबित्त्व कमी व्हावे यासाठी हा प्रोजेक्ट राबवला जात आहे.

पाकिस्तानचं टेन्शन वाढणार?

दरम्यान, अरबी समुद्र भारतासाठी फारच महत्त्वाचा आहे. मुंबईवरील हल्ला करण्यासाठी दहशतवादी याच समुद्रमार्गे आले होते. त्यामुळे समुद्री सीमेचे संरक्षण करण्यासाठी भारताचे नौदल सज्ज असणे गरजेचे आहे. त्यामुळेच या पाणबुड्यांच्या निर्मितीच्या चर्चेला हिरवा झेंडा देण्यात आला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानपुढे आव्हान निर्माण होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.