जर्मनीच्या दोन दिग्गज वाहन निर्मात्या कंपन्या Mercedes-Benz आणि BMW आतापर्यंत एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. आताच्या मीडियाच्या रिपोर्ट्सच्या मते दोन कंपन्यात इंजिनाच्या संदर्भात करार करण्यासाठी अंतिम बातचित सुरु आहे. जर ही बोलणी सुरळीत झाली तर जर्मन ऑटो इंडस्ट्रीत आतापर्यंत सर्वात मोठा सामंजस्य करार म्हटला जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सच्या मते Mercedes आपल्या येणाऱ्या आगामी पेट्रोल आणि प्लग-इन हायब्रिड कारमध्ये BMW चे प्रसिद्ध B48 चार सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिनाचा वापर करणार आहे. हे इंजिन आधीच BMW आणि मिनीच्या अनेक कारमध्ये लावले जात आहे. याचे सगळ्यात वैशिष्ट्ये हे आहे की हे वेगवेगळ्या कार प्लॅटफॉर्मवरवर फिट केले जाऊ शकते. मग ते ट्रांसवर्स असे की लोंगिट्युडिनल. यामुळे हे Mercedes च्या CLA, GLA, GLB, C-क्लास, E-क्लास आणि येणाऱ्या लिटील G SUV सारख्या कारसाठी उपयुक्त सिद्ध होणार आहे.
आता Mercedes च्याजवळ सध्या 1.5 लीटरचे M252 इंजिन आहे. जे माईल्ड-हायब्रिड टेक्नॉलॉजीसाठी उत्तम आहे. परंतू यास प्लग-इन हायब्रिड वा रेंज- एक्सटेंडरच्या रुपात वापर करणे शक्य नाही. अशात B48 इंजिन त्याची कमतरता पूर्ण करणार आहे.
या सामंजस्य करारानुसार इंजिनचे प्रोडक्शन BMW अंतर्गत ऑस्ट्रीया स्थित स्टायर प्लांटमध्ये होऊ शकते. तसेच दोन्ही कंपन्या अमेरिकेत एक संयुक्त फॅक्ट्री लावण्याचा विचार देखील करत आहेत. ज्यामुळे वाढत्या आयात शुल्कापासून वाचता येणार आहे.
Mercedes च्या या डिलचा एक फायदा होणार आहे. विना जास्त R&D खर्च न करता प्रमाणित, युरो-7 कंप्लायंट इंजिन लागलीच उपलब्ध होणार आहे. याचा वापर करुन कंपनी आपल्या प्लग-इन हायब्रिड रेंजला खूप वेगाने वाढू शकणार आहे.
या डीलने केवळ Mercedes चा फायदा होईल असे नव्हे तर BMW चा देखील फायदा होणार आहे. याची प्रोडक्शन क्षमतेचा संपूर्ण वापर होई शकेल. आणि इंजिन पुरवठा वाढवण्यासाठी फॅक्ट्रीची दक्षता देखील वाढणार आहे.