SBI Fellowship India: ग्रामीण विकासासाठी काम करायचंय? SBI Youth for India फेलोशिपसाठी आजच अर्ज करा!
esakal August 24, 2025 11:45 PM

थोडक्यात:

  • SBI Youth for India Fellowship हा १३ महिन्यांचा पूर्ण फंडेड प्रोग्राम आहे ज्यामध्ये युवांना ग्रामीण विकासासाठी काम करण्याची संधी मिळते.

  • या फेलोशिपसाठी २१ ते ३२ वर्षे वयाचे आणि पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

  • फेलोशिपमध्ये सहभागी होऊन आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सशक्तीकरण अशा विविध क्षेत्रांत काम करता येते.

  • SBI Youth for India Fellowship 2025: भारतामध्ये ग्रामीण भागाचा विकास हा देशाच्या समृद्धीचा पाया मानला जातो. जर तुम्हाला समाजात खऱ्या अर्थाने बदल घडवायचा असेल आणि ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात सुधारणा करायची असेल, तर SBI Youth for India Fellowship तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे

    SBI Youth for India Fellowship ही एक १३ महिन्यांची संपूर्ण फंडेड फेलोशिप आहे, ज्यामध्ये तरुणांना देशातील ग्रामीण भागात जाऊन समाजसेवा करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी काम करण्याचा सुवर्णयोग मिळतो.

    Ganpatipule Travel: गणेशोत्सवात गणपतीपुळेच्या दर्शनासाठी जाताय? या जवळच्या ठिकाणांना देखील भेट द्या! SBI Youth for India Fellowship म्हणजे काय?

    SBIYouth for India ही १३ महिन्यांची पूर्ण फंडेड फेलोशिप आहे. यात निवड झालेल्या तरुणांना भारतातील गावागावात जाऊन काम करण्याची संधी मिळते. ते १३ प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून टिकाऊ विकासासाठी योजना बनवतात आणि अंमलात आणतात.

    २०११ पासून या फेलोशिपने २१ राज्यांतील २५० पेक्षा जास्त गावांमध्ये १.५ लाखांहून अधिक लोकांच्या जीवनात बदल घडवून आणले आहेत.

    कोण अर्ज करू शकतो?

    वयाची अट: २१ ते ३२ वर्षे (१३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत)

    शैक्षणिक पात्रता: पदवीधर (कोणत्याही शाखेत)

    इच्छुक उमेदवारांनी सामाजिक बदल घडवण्याची इच्छा आणि ग्रामीण भागात काम करण्याची तयारी असावी.

    SBI कर्मचारी, OCI, NRI तसेच नेपाल व भूटानचे नागरिक देखील अर्ज करू शकतात.

    Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व फेलोशिपमध्ये काय काम कराल?

    फेलोजना विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळते, जसे की:

    - आरोग्य सेवा आणि जनजागृती

    - शिक्षण आणि कौशल्य विकास

    - महिला सशक्तीकरण

    - पर्यावरण संरक्षण आणि जल व्यवस्थापन

    - पर्यायी ऊर्जा आणि स्वच्छता

    - सामाजिक उद्यमशीलता

    - पारंपरिक कला आणि हस्तकला

    अर्ज कसा करावा?

    अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ apply.youthforindia.org या वेबसाईटला भेट द्या.

    ईमेलद्वारे रजिस्टर करा.

    आवश्यक माहिती भरून ऑनलाइन अर्ज सबमिट करा.

    अर्जाची अंतिम तारीख

    ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येतील. त्यामुळे विलंब न करता आजच अर्ज करा आणि देशाच्या ग्रामीण भागात बदल घडवण्याचा भाग बना!

    फेलोशिपचे फायदे

    ग्रामीण भारताचा थेट अनुभव

    सामाजिक समस्यांवर काम करून व्यक्तिमत्व विकास

    फुल्ली फंडेड (रहाणे, जेवण, प्रवास यांचा समावेश)

    भविष्यातील करिअर संधींना चालना

    Natural Skincare Tips: घरच्या घरी नैसर्गिक स्किनकेअर करायचं आहे? मग आजीचे गुपित फंडे नक्की ट्राय करा! FAQs

    1. फेलोशिपसाठी कोण अर्ज करू शकतो? (Who can apply for the fellowship?)

    फेलोशिपसाठी वय २१ ते ३२ वर्षे आणि पदवीधर असलेले युवक अर्ज करू शकतात. SBI कर्मचारी, OCI, NRI तसेच नेपाल आणि भूटानचे नागरिक देखील अर्ज करू शकतात.

    2. फेलोशिप किती काळासाठी असते? (What is the duration of the fellowship?)

    ही फेलोशिप १३ महिन्यांची असते.

    3.फेलोशिपमध्ये कोणत्या क्षेत्रांत काम करता येते? (What areas will fellows work in?)

    आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सशक्तीकरण, पर्यावरण संरक्षण, जल व्यवस्थापन, पर्यायी ऊर्जा, सामाजिक उद्यमशीलता आणि पारंपरिक कला अशा अनेक क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळते.

    4. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे? (What is the last date to apply?)

    अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.