पोयनाड परिसरात उत्साह
esakal August 24, 2025 11:45 PM

पोयनाड परिसरात उत्साह
पोयनाड, ता. २४ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड पंचक्रोशी गणेशोत्सवासाठी सज्ज झाली आहे. पोयनाड बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पोयनाड बाजारपेठेसह खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा उत्साह दिसून आला.
पोयनाडसह ताडवागळे, कुर्डूस, कोळघर, चरी, शहापूर, शहाबाज, वाघ्रण, नारंगी, मानकुळे या भागातील ग्राहकांनी पोयनाड बाजारपेठेत खरेदीला प्राधान्य दिले आहे. गुरुवारपासूनच पेण, हमरापूर, शिर्की येथून गणपती घरोघरी आणण्यास सुरुवात केली आहे. घरगुती गणपती असल्याने त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंना स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
़़़़़़ः--------------------------------
होमगार्ड तैनात
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने पेण-अलिबाग राज्यमार्गावर पांडवादेवी, पोयनाड नाका, पेझारी नाका, पेझारी चेकपोस्ट येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी होमगार्ड तैनात केले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.