Vastu Tips : करा हे सोपे उपाय, कर्जापासून मिळेल मुक्ती, वास्तुशास्त्र काय सांगतं?
Tv9 Marathi August 24, 2025 11:45 PM

सगळं सुरळीत सुरू असताना अचानक एखाद्या व्यक्तीवर मोठं आर्थिक संकट येतं, प्रचंड प्रमाणात धनहानी होते, त्यामुळे व्यक्ती कर्जबाजारी होतो. अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे काही सूचत नाही. कितीही पैसा कमावला तर तो हातात टिकत नाही. अशा अनेक समस्या तुमच्या घरात असलेल्या वास्तुदोषामुळे निर्माण होऊ शकतात. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी हेच सांगितलं जात नाही, तर तुमच्या घरात असलेल्या वस्तूंची योग्य दिशा कोणती असावी, जर दिशा चूकत असेल तर तुमच्या आयुष्यात काय अडचणी येऊ शकतात? याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जातं. दरम्यान वास्तुशास्त्रात काही असे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्हाला कर्जपासून मुक्ती मिळू शकते, नेमके काय आहेत उपाय आणि वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे? जाणून घेऊयात.

घराच्या उत्तर दिशेला स्वच्छता ठेवा – वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा ही तुमच्या धन आणि संपत्तीशी जोडलेली असते, त्यामुळे घराची उत्तर दिशा स्वच्छ असेल, तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहातो. तुम्हाला कधीच पैशांची कमी भासत नाही. तुम्हाला कर्जापासून सुटका मिळते.

तुळस – हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळस ही विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. ज्यामुळे ज्या घरात तुळस आहे, त्या घरावर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहातो. तिजोरी पैशांनी भरलेली राहाते. कर्जातून सुटका मिळते.

घरातील मुख्य दरवाजावर स्वस्तिक – तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह असावं, यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात नेहमी सकारात्म ऊर्जा प्रवाहित होते. यामुळे तुमच्या अनेक समस्या निर्माण होण्यापूर्वीच नष्ट होतात.

तिजोरीचं स्थान – तुमच्या घरात असलेल्या तिजोरीचं स्थान हे योग्य असणं महत्त्वाचं असतं, ज्यामुळे तुमच्यावर कधीही आर्थिक संकट येत नाही. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील तिजोरी ही नेहमी दक्षिण -पश्चिम दिशेला असावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.