SBI क्रेडिट कार्ड धारकांना धक्का, 1 सप्टेंबरपासून नवा नियम लागू होणार, ‘या’ सुविधा बंद होणार
Marathi August 25, 2025 05:25 PM

नवी दिल्ली : एसबीआय क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम 1 सप्टेंबरपासून बदलणार आहेत. या बदलामुळं क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांना धक्का बसणार आहे. एसबीआय कार्डसकडून एक नोटिफिकेशन काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे. 1 सप्टेंबरपासून काही कार्डसवरील रिवॉर्ड पॉईंट देणं बंद केलं जाणार आहे. लाइफ स्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड, लाइफ स्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड सिलेक्ट आणि लाइफ स्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड प्राइम यांना मिळणारे फायदे आणि काही व्यवहारांवर मिळणारे SBI Reward Points बंद केले जाणार आहेत.

1 सप्टेंबरपासून बदलल्या जाणाऱ्या नियमांनुसार ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर करण्यात आलेल्या कोणत्याही व्यवहारावर रिवॉर्ड पॉइंट दिले जाणार नाहीत. याशिवाय यूजरनं क्रेडिट कार्डचा वापर सरकारी सेवांसाठी केल्यास त्यावर यापूर्वी रिवॉर्ड पॉइंट दिले जायचे ते देखील देणं बंद केलं जाणार आहे. हे नियम मर्चंट व्यवहारांवर देखील लागू असतील.

याशिवाय 16 सप्टेंबर 2025 पासून कार्ड सुरक्षा योजना (CPP)एसबीआय कार्ड ग्राहक ऑटोमेटिक संदर्भातील नुतनीकरणाची तारखेच्या आधारवर अपडेट केलेल्या प्लॅन वेरिएंटमध्ये ट्रान्सफर होइल. एसबीआय कार्डसकडून याची सूचना निर्धारित तारखेपूर्वी 24 तास अगोदर एसएमएस आणि ईमेलद्वारे दिलं जाणार आहे.

एसबीआय कार्डसकडून सातत्यानं क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम बदलले जात आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एसबीआय कार्डसकडून क्रेडिट कार्डबाबतचे नियम बदलण्यात आले होते. काही क्रेडिट कार्डवर मिळणारा कॉम्प्लिमेंटरी हवाई अपघात कवर बंद केला होता. तो 50 लाख रुपये 1 कोटी रुपयांपर्यंत होता. ते बदल SBI Elite आणि एसबीआय प्राइम कार्ड वरील होते.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.