धायगुडेवाडीत हरिनाम सप्ताह उत्साहात
esakal August 26, 2025 01:45 PM

केडगाव, ता. २५ : चौफुला-धायगुडेवाडी (ता. दौंड) येथील विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम यंदा झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताहात वीणा पूजन महंत लक्ष्मणनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. कलशपूजन सरपंच बाळासाहेब सोडनवर, संजय धायगुडे यांनी केले. तर ग्रंथपूजन नगररचना विभागाचे उपसंचालक दत्तात्रेय काळे, मल्हारी सोडनवर, रघुनाथ सरगर यांनी केले. सप्ताहात आबा खेडकर, नामदेव राऊत, अंजनी ढवळे, किशोर लडकत, तुषार दुरगुडे, विद्या जगताप, बापू टेंगले यांची कीर्तनसेवा झाली.
आमदार राहुल कुल यांनी मंदिरासमोरील सभामंडपासाठी निधी दिला. विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळाने लोकवर्गणी करून इतर कामे केली. सप्ताहात भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल, माजी सभापती मीना धायगुडे आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.