'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपटातून उलगडणार प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट; हास्यजत्रेमधील 'हा' अभिनेता दिसतोय मुख्य भूमिकेत
esakal August 26, 2025 01:45 PM

आयुष्याचा प्रवास सुरु झाला की प्रत्येकाला प्रेमाच्या स्टॉप वर थांबावंसं वाटतंच , काहीजणं थांबतात , काहीजणं रमतात , काहीजणं भेटतात . प्रवास पुढे चालू राहतो पण त्या स्टॉप वरचं रेंगाळण मनात साठून राहतंच . अशीच प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट असलेला 'लास्ट स्टॉप खांदा' हा संगीतमय चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे.

चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. श्रेयस राज आंगणे, श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankit Archana Arjun Pandhare (@kal_ankclick)

प्रेमाच्या नात्याचा वेध आजवर अनेक चित्रपटांमधून घेतला गेला आहे. तरीही प्रेम या संकल्पनेच्या नवनव्या गोष्टी चित्रपटांतून मांडल्या जातात. "लास्ट स्टॉप खांदा..." प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटातूनही अशीच एक नावीन्यपूर्ण कहाणी मांडण्यात आली आहे. या गोष्टीला श्रवणीय संगीताचीही साथ आहे. चित्रपटातून एक तरुण आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार असून प्रत्येकाला रीलेट होईल अशीच ही गोष्ट आहे. नव्या दमाचे कलाकार, उत्तम कथा, तांत्रिकदृष्ट्या सकस असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता २१ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी "लास्ट स्टॉप खांदा"... प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदिप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे.

हो, मी डेट करतेय... घटस्फोट अन् ब्रेकअपनंतर रुपाली भोसले पुन्हा प्रेमात! म्हणाली, 'जो माझ्या आयुष्यात येईल त्याला...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.