ज्योतिष शास्त्रानुसार अशा अनेक उपाय असतात ज्यामुळे आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी आपण दूर करू शकतो. त्यासाठी अर्थातच काही नियम असतात. ज्योतिष शास्त्रानुसार पैशांच्याबाबत देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर आर्थिक तंगी जाणवत असेल तर काही उपाय असे असतात जे आपण करू शकतो.
प्रत्येक व्यक्तीला त्याची पर्स नेहमीच भरलेली असावी असं वाटतं. परंतु, बऱ्याचदा काही कारणास्तव आर्थिक अडचणी येतात. त्यावर ज्योतिष्य शास्त्रात अनेक उपायही सांगितले आहेत.
यासाठी जर राशीनुसार देखील काही उपाय केले जाऊ शकतात. यामुळे आनंद, शांती आणि सौभाग्य देखील मिळेल. त्यासाठी तुमच्या राशीनुसार तुमच्या पाकीटात काय ठेवावं ज्यामुळे त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील.
मेष रास
मंगळ ग्रहाच्या मालकीची ही राशी खूपच अॅग्रेसिव्ह असते. या राशीच्या लोकांनी त्यांच्या पर्समध्ये तांब्याचे नाणे ठेवावं. यामुळे मंगळाची ऊर्जा त्यांना मिळते, ज्यामुळे संपत्ती आणि आत्मविश्वास वाढतो.
वृषभ रास
शुक्र ग्रहाच्या मालकीची ही राशी पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्याने ती लवकर संपत्ती आकर्षित करते. या राशीच्या लोकांनी त्यांच्या पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवावे.
मिथुन रास
बुध ग्रहाच्या स्वामी असलेल्या या राशीच्या लोकांनी त्यांच्या पर्समध्ये हिरवी वेलची किंवा हिरव्या रेशमी कापडाचा तुकडा ठेवावा. यामुळे त्यांचा संवाद सुधारतो आणि आशीर्वादही मिळतो.
कर्क राशीचे चिन्ह
चंद्राच्या अधिपत्याखाली असलेल्या या राशीच्या लोकांनी त्यांच्या पर्समध्ये चांदीचे नाणे किंवा मोती ठेवावे. यामुळे त्यांना मानसिक शांती मिळते आणि त्यांची संपत्तीही अबाधित राहते.
सिंह राशीचे भविष्य
सिंह रास सूर्याची रास असते. या राशीच्या लोकांनी त्यांच्या पर्समध्ये सूर्ययंत्र किंवा सोनेरी रेशमी कापडाचा तुकडा ठेवावा. यामुळे सूर्याचे आशीर्वाद मिळतात आणि नेतृत्व क्षमता बळकट होतात.
कन्या रास
बुध ग्रहाचा स्वामी असलेल्या या राशीच्या लोकांनी त्यांच्या पर्समध्ये एका छोट्या पुडीत बांधून हिरवी बडीशेप किंवा हरभरा डाळ ठेवावी. यामुळे त्यांच्या जीवनातील समस्या कमी होतात आणि शांती मिळते.
तुळ रास
शुक्राच्या अधिपत्याखाली असलेल्या या राशीसाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संतुलन राखणे महत्वाचे असते. पर्समध्ये चांदीचे नाणे आणि चांदीचे श्रीयंत्र ठेवल्याने या राशीच्या लोकांना धनसंपत्तीचा आशीर्वाद मिळेल.
वृश्चिक रास
वृश्चिक रास ही मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. या राशीच्या लोकांनी त्यांच्या पर्समध्ये तांब्याचे नाणे किंवा लाल चंदनाचा एक छोटा तुकडा ठेवावा. त्यांना नक्कीच याचे फायदे मिळतील.
धनु रास
गुरुच्या मालकीच्या या राशीच्या लोकांनी त्यांच्या पर्समध्ये हळदीचा एक छोटा तुकडा ठेवावा. यामुळे अनेक गोष्टी सुरळीत होण्यास मदत होते. येते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.
मकर रास
या राशीच्या लोकांनी, या राशीचे स्वामी शनीदेव असतात. त्यांनी पर्समध्ये लोखंडाचा तुकडा ठेवावा. यामुळे त्यांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो.
कुंभ रास
भगवान शनिदेव यांच्या मालकीच्या या राशीच्या लोकांना त्यांच्या पर्समध्ये चांदी, लोखंड किंवा अष्टधातुचा तुकडा ठेवल्याने फायदा होतो.
मीन रास
गुरुच्या मालकीच्या या राशीच्या लोकांनी आध्यात्मिक वाढीसाठी आणि त्यांच्या विचारसरणीचा विकास करण्यासाठी त्यांच्या पर्समध्ये केशर किंवा पिवळ्या फुलाचा तुकडा ठेवावा.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )