नागपूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी लाखावर मराठे विदर्भातून २९ ऑगस्टला मुंबईतील मोर्चासाठी रवाना होणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक उमेश घाडगे यांनी पत्रकातून दिली आहे.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात यावे, या मागण्यांचा पाठपुरावा या मोर्चाद्वारे करण्यात येईल.
Nagpur Fake Shalarth ID Scam: ६८० शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार; शालार्थ घोटाळा, बनावट आयडी तयार केल्याचे उघडवर्धा जिल्ह्यातून संदीप भांडवलकर यांच्या नेतृत्वात, अमरावती जिल्ह्यातून अंबादास काचोळे यांच्या नेतृत्वात तर नागपूर जिल्ह्यातून उमेश घाडगे यांच्या नेतृत्वात आंदोलनात मराठा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाग्यश्री शिर्के महिला राज्य समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा व विदर्भ महिला अध्यक्ष छावा मराठा युवा संघटना महिलांचे नेतृत्व करणार आहेत.